Ranbir-Aliya rejects ads together! Read, what's the real reason !! | एकत्र जाहिराती करण्यास रणबीर-आलियाचा नकार! वाचा, काय आहे खरे कारण!!
एकत्र जाहिराती करण्यास रणबीर-आलियाचा नकार! वाचा, काय आहे खरे कारण!!
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या कधी नव्हे इतक्या जोरात आहे. साहजिकच या बातम्या ‘कॅश’ करण्याचे प्रयत्नही तितक्याच जोरात सुरू आहेत. होय, आलिया व रणबीरच्या अफेअरच्या बातम्या मीडियात चघळल्या जावू लागल्या आणि लगेच आलिया व रणबीरला एकत्र जाहिराती करण्याच्या आॅफर्स येऊ लागल्यात. पण ताज्या बातमीनुसार, रणबीर व आलिया दोघांनीही एकत्र जाहिराती करण्याच्या आॅफर्स धुडकावून लावल्या आहेत आणि यामागे करण जोहरचा मेंदू आहे. होय, करणच्या सांगण्यावरूनच या दोघांनी एकत्र जाहिराती करण्यास नकार दिल्याचे कळतेय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणच्या मते, ही आलिया व रणबीरसाठी त्यांचे नाते जगजाहिर करण्याची योग्य वेळ नाहीयं. दोघांचाही ‘ब्रह्मास्त्र’ पुढील वर्षी आॅगस्टमध्ये येणार आहे. तो येण्यास अद्याप बराच वेळ आहे. करणच्या मते, ‘ब्रह्मास्त्र’ या रिलीज डेटच्या जवळपास दोघांनीही आपले रिलेशनशिप जगजाहिर केले  तर त्याचा फायदा चित्रपटालाही मिळू शकतो. ही सगळी समीकरणे करणने आलिया व रणबीरच्या गळी उतरवली आणि आलिया व रणबीरलाही ती पटली. या एकाच कारणामुळे दोघांनीही एकत्र जाहिराती करण्यास नकार दिल्याचे कळतेय.

ALSO READ : तिला तिचे आयुष्य जगू द्या ना...! कुणाबद्दल इतक्या कळकळीने बोलली पूजा भट्ट?

‘ब्रह्मास्त्र’  एक ट्रायोलॉजी चित्रपट आहे. म्हणजे, या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक असे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. याच्या पहिल्या भागाचे शूटींग सुरू आहे. यावर्षाच्या प्रारंभी बुल्गेरियात याचे पहिले शूटींग शेड्यूल पार पडले. हा चित्रपट पुढीलवर्षी १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात आलिया व रणबीरशिवाय अमिताभ बच्चन हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या चित्रपटासाठी रणबीर आणि आलिया अनेक दिवसांपासून मेहनत घेतायेत. दोघांनी यासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे.  
Web Title: Ranbir-Aliya rejects ads together! Read, what's the real reason !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.