वरुण धवन 'ह्या' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पोहोचला रामोजी फिल्म सिटीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 10:22 AM2018-12-22T10:22:54+5:302018-12-22T10:29:42+5:30

करण जोहर दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असणार आहेत.

 Ramoji Film City reached Varun Dhawan for the shooting for This film | वरुण धवन 'ह्या' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पोहोचला रामोजी फिल्म सिटीत

वरुण धवन 'ह्या' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पोहोचला रामोजी फिल्म सिटीत

googlenewsNext
ठळक मुद्देवरुण नुकताच हैदराबादमध्ये दाखल'कलंक' सिनेमासाठी वरूणने घेतली खूप मेहनत

करण जोहर दिग्दर्शित 'कलंक' चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असणार आहेत. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वरुण नुकताच हैदराबादमध्ये दाखल झाला आहे.

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे सध्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात वरुणशिवाय सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे, हे कलाकारदेखील वरुण पाठोपाठ चित्रीकरणासाठी हैदराबादमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

'कलंक' सिनेमासाठी वरूणने खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमात वरुण रिप्पड बॉडीसाठी भरपूर वर्कआऊट करत आहे. त्यात तो लोहारची भूमिका साकारणार आहे. त्याचे दुकान लाहौर मार्केटमध्ये आहे. ते हिरा मंडीच्या नावावने प्रसिद्ध असते.

लोहाराचे शारीरिक काम जास्त असते त्यामुळे त्याचे वजन वाढवल्याचेही त्यांनी सांगितलं. शिवाय वरुणनेदेखील यासाठी बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले. वरुणची बॉडी आधीच पिळदार होती. कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. तो छाती आणि कमरेवर जास्त लक्ष देतो. वजन वाढवण्यासह वरुणच्या अॅब्सवर जास्त लक्ष देण्यात आलं आहे. 
या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे तब्बल २१ वर्षांनंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्तची जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे. चांगली स्टारकास्ट असल्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 

Web Title:  Ramoji Film City reached Varun Dhawan for the shooting for This film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.