Rakhi Sawant shared his self with 'photo'; Users reciprocated response! | राखी सावंतने ‘हा’ फोटो शेअर करून स्वत:चे केले हसू; युजर्सनी दिल्या उलटसुलट प्रतिक्रिया!

आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. वास्तविक चर्चेत राहण्यासाठी बºयाचदा राखीच स्वत:हून असे कारनामे करीत असते. आता ती तिच्या एका फोटोमुळे अन् त्यास दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, राखी सावंतने इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये ती काही एअर होस्टेसेज्सोबत बघावयास मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना राखीने लिहिले की, ‘आॅल जेट एअरवेज एअर होस्टेज.’ वास्तविक तिला ‘एअर होस्टेस’ असे लिहायचे होते. परंतु तिने ‘एअर होस्टेज’ असे लिहिले. ‘होस्टेज’चा अर्थ कोणाला तरी बंदी बनविणे, असा होतो. त्यामुळे राखीने दिलेल्या या कॅप्शनचा पूर्ण अर्थच बदलून गेला आहे. 

राखीने दिलेल्या कॅप्शननुसार, ‘जेट एअरवेजचे सर्व एअर होस्टेस’ असे होण्याऐवजी ‘जेट एअरवेजचे सर्व बंदी’ असा झाला आहे. राखीच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर तिचे हसू व्हायला लागले. जेव्हा तिला ही बाब लक्षात आली, तेव्हा तिने लगेचच फोटोचे कॅप्शन डिलीट केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण युजर्सनी या कॅप्शनवरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. कॉमेटबॉक्समध्ये तर सातत्याने तिच्या हुशारीवरून टीका केली गेली. एका युजरने लिहिले, ‘असा एखादाच असेल ज्याने ‘होस्टेज’ला एवढे आनंदी बघितले असेल’! आणखी एका युजरने लिहिले की, ‘जेट एअरवेजच्या सर्व मुली आता बंदी बनल्या आहेत. तर एका युजरने लिहिले, ‘राखी तू त्यांना का बरं बंदी केले आहेस?’ ट्विटरवरदेखील राखीच्या या पोस्टची खिल्ली उडविली जात आहे. 
 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राखी सातत्याने चर्चेत राहात आहे. जेव्हा तिने एका कंडोम ब्रॅण्डची जाहिरात करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ती सातत्याने ट्रोल होत आहे. राखीने एक व्हिडीओ शेअर करून तिचे फेव्हरेट कंडोम ब्रॅण्ड्स सांगितले होते. त्यावरून राखीवर सर्वत्र टीका झाली होती. 
Web Title: Rakhi Sawant shared his self with 'photo'; Users reciprocated response!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.