Rakhi Sawant meets Saif Ali Khan, if you can not believe, watch the video! | राखी सावंतला मिळाला तिचा सैफ अली खान, विश्वास बसत नसेल तर व्हिडीओ पहा!

बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत कधी काय करेल, याचा भरवसा नाही. ती नेहमीच काही ना काही उपद्व्याप करून चर्चेत असते. खरं तर चर्चेत राहण्याची राखीला चांगलीच कला अवगत झाली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. आता राखी एका आगळ्यावेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. होय, राखीला चक्क तिचा सैफ अली खान भेटला आहे. राखीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यामध्ये ती अमेरिकन सैफ अली खान भेटला असल्याचे सांगत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओ दिसणाºया व्यक्तीचा चेहरा सैफच्या चेहºयाशी साम्य साधत असल्याने, तिचा हा व्हिडीओ चांगलाच शेअर केला जात आहे. 

दरम्यान, राखीने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करताना त्यात ‘दुल्हा मिल गया’ अशी घोषणा केली होती. आता या व्हिडीओनंतर राखीचा सैफ अली खान भेटल्याचा व्हिडीओ समोर आल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्हिडीओमध्ये राखी म्हणते की, करिना कपूर-खान जरा बघ मला सैफ अली खान भेटला आहे. हा सैफ अली खान देशी नसून विदेशी आहे. बघ त्याचे केसही सैफ सारखेच आहेत. विशेष म्हणजे जी व्यक्ती व्हिडीओमध्ये दिसत आहे, ती काहीशी सैफसारखीच दिसत आहे. 
 

सध्या राखी लंडनमध्ये असून, त्याठिकाणी तिला हा सैफ अली खान भेटला आहे. विशेष म्हणजे राखी असे म्हणताना दिसत आहे की, ‘मला माझा सैफ अली खान मिळाला असून, कदाचित लवकरच मी त्याच्याशी लग्न करू शकते.’ आता राखीचे लग्न करण्याचे वक्तव्य तिचे चाहते किती गांभीर्याने घेतील हे सांगणे मुश्कीलच आहे. कारण टीव्हीवर जाहीरपणे स्वयंवर पद्धतीने लग्न करणाºया राखीचे ते लग्न किती काळ टिकले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 
Web Title: Rakhi Sawant meets Saif Ali Khan, if you can not believe, watch the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.