Rakhi Sawant called the umpire as a corrupted, messy mess! | राखी सावंतने अम्पायरलाच म्हटले भ्रष्ट, असा घातला गोंधळ!

ड्रामा क्वीन राखी सावंत ज्याठिकाणी जाते त्याठिकाणी हमखास गोंधळ घालून येते. सध्या ती एमटीव्ही बीसीएलमध्ये बघावयास मिळत आहे. याठिकाणी सध्या राखी तिने घातलेल्या गोंधळामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. होय, राखी चक्क अम्पायरवर भ्रष्ट असल्याचा आरोप केला आहे. एकता कपूर आणि आनंद मिश्राच्या गोवा किलर संघाकडून खेळत असलेल्या राखी सावंतने अम्पायरवर आरोपांच्या अक्षरश: फैरी झाडल्या. तिने विविध आरोप करीत गोंधळ घातला. 

त्याचे झाले असे की, खेळादरम्यान जेव्हा अम्पायरने नो बॉल दिला तेव्हा राखी शांत उभी होती. मात्र नंतर याविषयी बोलताना राखीने म्हटले की, ‘अखेर अम्पायर दुसºया टीमचे बाजू का घेत आहेत? अम्पायरने काही सेटिंग तर केली नाही ना? वास्तविक राखीने हे सर्व चेष्टामस्करीत म्हटले, परंतु मनातील गोष्ट सांगणे तिने टाळले नाही. राखी एवढ्यावरच थांबली नाही, तर पुढे बोलताना राखीने म्हटले की, ‘मला समजले आहे की, कालच अम्पायरला बॅग आणि पॅकेट पाठविण्यात आले आहे. मी हिरवी मिर्ची आहे, पण हे सर्व बघून लवकरच लाल होईल. अम्पायरजी तुम्ही चुकीचे करीत आहेत. रात्री तुम्ही पॅकेट स्वीकारले आहे. असो, अम्पायरने सेटिंग केली की नाही हे जरी गुलदस्त्यात असले तरी राखी या आरोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या राखी या सिरीजचा पुरेपूर आनंद घेताना बघावयास मिळत आहे. एमटीव्ही बीसीएलमध्ये मस्तीचा चांगलाच हंगामा बघावयास मिळत आहे. खरं तर राखी सावंतने हे सर्व नेहमीप्रमाणे पब्लिसिटी मिळविण्यासाठी केले असावे. कारण ती ज्याठिकाणी जाते त्याठिकाणी आपल्या वायफळ वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आताही तिने असाच काहीसा फंडा याठिकाणी वापरला असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 
Web Title: Rakhi Sawant called the umpire as a corrupted, messy mess!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.