Rajpal Yadav and his wife have been convicted by the court, what exactly is the matter of the read? | राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला न्यायालयाने ठरविले दोषी, वाचा नेमके काय आहे प्रकरण?

अभिनेता राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादव यांना दिल्लीतील कडकड्डूमा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविले आहे. २०१० मध्ये एक दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करण्यासाठी या दोघांनी पाच कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज फेडण्यास दोघेही अपयशी ठरली. त्यांचा ‘अता पता लापता’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये राजपाल यादव, दारासिंग, असरानी आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दरम्यान, न्यायालयाने राजपाल यादव याच्यासह कंपनी आणि पत्नीला चेक बाउंससह सात प्रकरणांमध्ये दोषी ठरविले. तक्रारदार अ‍ॅड. एस. के. शर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी सर्व दोषींच्या शिक्षेची सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या लक्ष्मीनगर येथील कंपनीने चेक बाउंस केल्याप्रकरणी सात तक्रारी दाखल केल्या होत्या. 

यासर्व तक्रारी वेगवेगळ्या दाखल केल्या होत्या. तक्रारदाराने म्हटले होते की, त्यावेळी राजपाल यादव त्याचा ‘अता पता लापता’ हा चित्रपट पूर्ण करण्यास व्यस्त होता. त्यावेळी त्याने एप्रिल २०१० मध्ये चित्रपट पूर्ण करण्यासाठी मदत मागितली होती. त्यानंतर ३० मे २०१० मध्ये दोघांमध्ये एक करार करण्यात आला. त्यानुसार आम्ही राजपाल आणि त्याच्या पत्नीला पाच कोटी रूपयांचे कर्ज दिले. या मोबदल्यात राजपाल यादव आम्हाला आठ कोटी रूपये परत देणार होता. 
 
दरम्यान, राजपाल यादवने १९९९ मध्ये आलेल्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. २०१८ मध्ये तो ‘शादी तेरी बजाएंगे हम बॅण्ड’ या चित्रपटात बघावयास मिळाला होता. राजपाल यादवने खूपच कमी काळात इंडस्ट्री कॉमेडी अभिनेता म्हणून स्वत:ची जागा निर्माण केली. बºयाचशा चित्रपटात त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अजूनही राजपालची कॉमेडी बघण्यास चाहते उत्सुक आहेत. अशात या प्रकरणामुळे तो अडचणीत सापडला असून, त्याला न्यायालय काय शिक्षा ठोठावणार याकडे मनोरंजन विश्वाचे लक्ष लागून आहे. 
Web Title: Rajpal Yadav and his wife have been convicted by the court, what exactly is the matter of the read?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.