आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 04:01 PM2018-12-16T16:01:51+5:302018-12-16T16:04:06+5:30

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी हिरोचा शोध सुरू होता आणि या भूमिकेसाठी राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा यांच्यात रस्सीखेच सुरु होती.

rajkummar rao joins the star cast of meghna gulzars laxmi agarwal biopic with deepika padukone | आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!!

आयुष्यमानचा ‘पत्ता कट’! राजकुमार राव बनणार दीपिका पादुकोणचा हिरो!!

googlenewsNext

लग्न, रिसेप्शन निपटल्यानंतर दीपिका पादुकोण आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागलीय. होय,दीपिका पुन्हा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये परतण्यास तयार आहे. लग्नानंतरचा दीपिकाचा पहिला चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी हिरोचा शोध सुरू होता आणि या भूमिकेसाठी राजकुमार राव व आयुष्यमान खुराणा यांच्यात रस्सीखेच सुरु होती.  या चित्रपटात मेकर्सला दीपिकाच्या तोडीचा दमदार अ‍ॅॅक्टर हवा होता. मेर्कर्सच्या डोक्यात या भूमिकेसाठी  राजकुमार राव आणि आयुष्यमान खुराणा या दोघांची नावे होती. पण दोघेही एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाहीत म्हटल्यावर या दोघांपैकी कुणाला साईन करावे, असा प्रश्न मेकर्सला पडला होता. पण आता मेकर्सनी दोघांपैकी एक नाव फायनल केलेय. हे नाव आहे, राजकुमार राव याचे. 


ताजी बातमी मानाल तर मेघना गुलजारने आपल्या या आगामी चित्रपटासाठी राजकुमारला साईन केले आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल. राजकुमारने या वर्षात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. श्रद्धा कपूरसोबतचा त्याचा ‘स्त्री’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट तर यंदाचा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे.
दीपिकाचा हा चित्रपट अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. लग्नानंतरचा डीपीचा हा पहिला चित्रपट असल्याचे चाहते उत्सूक आहेत.मेघना गुलजार  ‘राजी’,‘तलवार’अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या ‘राजी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. ‘राजी’नंतर मेघना अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय.  

Web Title: rajkummar rao joins the star cast of meghna gulzars laxmi agarwal biopic with deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.