Rajinikanth's divorce is 'this' because of divorce | ​रजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटाचे ‘हे’ आहे कारण

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळीकडेच खळबळ उडवून दिली. सौंदर्या आणि अश्विन यांचा संसार तुटल्यावर सोशल मीडियावर अनेकांनी हळहळसुद्धा व्यक्त केली.

घटस्फोटाचे नेमके कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क केले जात होते. मात्र खरे कारण काही कळू शकले नाही.

या जोडप्याच्या जवळच्या सुत्रांनुसार, सौंदर्या आणि अश्विन यांचे संबंध गेले काही दिवस चांगले नव्हते. त्यांच्या नात्यामध्ये प्रेम राहिले नव्हते. एकमेकांशी ते बोलतदेखील नव्हते. हेच कारण आहे की, दोघांनी आपापली वेगळी वाट शोधण्याचा निर्णय घेतला.

एवढेच नाही तर चार वर्षे एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी केवळ करायचे म्हणून लग्न केले होते. दोघांमध्ये प्रेमाचा ओलावा राहिलाच नव्हता. आता हे कितपत खरे आहे हे ते दोघेच जाणो; परंतु यावर्षी सेलिब्रेटी घटस्फोटांची वाढती संख्या चिंतेची गोष्ट आहे.
Web Title: Rajinikanth's divorce is 'this' because of divorce
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.