‘2.0’ची रिलीज डेट आली! रजनीकांत यांच्या चाहत्यांना मिळणार ‘डबल ट्रिट’!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:47 AM2018-07-11T10:47:31+5:302018-07-11T10:48:16+5:30

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाली आहे.

rajinikanth and akshay kumar starrer film 2.o release date annouced | ‘2.0’ची रिलीज डेट आली! रजनीकांत यांच्या चाहत्यांना मिळणार ‘डबल ट्रिट’!!

‘2.0’ची रिलीज डेट आली! रजनीकांत यांच्या चाहत्यांना मिळणार ‘डबल ट्रिट’!!

googlenewsNext

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक एस़ शंकर आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी ट्विट करून ‘2.0’च्या रिलीज डेटची घोषणा केली. त्यानुसार, हा चित्रपट याचवर्षी २९ नोव्हेंबरला रिलीज होतोय.
याचवर्षी ७ जूनला रजनीकांत यांचा ‘काला’ रिलीज झाला होता. यानंतर उण्यापु-या सहा महिन्यांत रजनीकांत यांचा ‘2.0’ हा दुसरा चित्रपट रिलीज होणार आहे. म्हणजे एकाच वर्षात रजनीकांत यांचे दोन लाईव्ह अ‍ॅक्शन चित्रपट रिलीज होतील. हा योग तब्बल २३ वर्षांनंतर जुळून आला आहे. यापूर्वी १९९५ साली रजनीकांत यांचे ‘भाषा’ आणि ‘मुथु’ असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर यंदा त्यांचे एकापाठोपाठ एक असे दोन चित्रपट पे्रक्षकांना पाहता येणार आहेत. साहजिकच रजनींच्या चाहत्यांसाठी ही डबल ट्रिट असणार आहे.
‘2.0’च्या प्रदर्शनाची तारीख आत्तापर्यंत अनेकदा लांबणीवर पडत आली आहे. यामुळे चित्रपटाचा बजेटही वाढला आहे. आधी हा बजेट १०० कोटी रूपये होता. पण सततच्या विलंबामुळे तो ५०० कोटींवर गेला. त्यामुळे हा चित्रपट आत्तापर्यंतचा सगळ्यात महागडा चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात काही चित्तथरारक स्पेशल इफेक्टस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

 

Web Title: rajinikanth and akshay kumar starrer film 2.o release date annouced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.