Raj kumar hirani name as producer is omitted from the new poster of ek ladki ko dekha to aisa laga | सोनम कपूरच्या सिनेमाच्या पोस्टर निर्माता राजकुमार हिराणींचे नाव गायब
सोनम कपूरच्या सिनेमाच्या पोस्टर निर्माता राजकुमार हिराणींचे नाव गायब

ठळक मुद्दे पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिल्वर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेतयेत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे

बॉलिवूडच्या या वर्षीच्या मोस्ट अवेडेट सिनेमाच्या लिस्टमध्ये 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चे नाव सामील आहे. पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर सिल्वर स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. सोनम आणि अनिल कपूरसोबत राजकुमार राव आणि जुही चावल यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.  एक रोमाँटिक सिनेमा आहे.    एक लडकी को देखा तो ऐसा लगा'. १९९४ साली विधू विनोद चोप्रा यांचा १९४२ अ लवस्टोरी हा सिनेमा प्रदर्शित केला होता. या सिनेमात 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं होते या गाण्यावरुन सिनेमाचे नाव घेण्यात आले आहे. राजकुमार आणि सोनम कपूर पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शैली चोप्रा करतेय तर विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी या सिनेमाची निर्मिती करतायेत.     या आधीच्या पोस्टरवर विधु विनोद चोप्रांसोबत राजकुमार हिराणी यांचे नाव को-प्रोड्यूसर्स म्हणून दिसत होते. मात्र आता नव्या पोस्टरवरून राज कुमार हिराणी यांचे नाव काढून टाकण्यात आल्याचे दिसतेय. नेमकं राजकुमार यांचे नाव का काढण्यात आले या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Raj kumar hirani name as producer is omitted from the new poster of ek ladki ko dekha to aisa laga
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.