रागिणी एमएमएस रिटर्न्समध्ये झळकणार दिव्या अग्रवाल आणि वरुण सुद?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 09:00 PM2019-04-10T21:00:00+5:302019-04-10T21:00:02+5:30

रागिणी एमएमएस रिटर्न्स या वेबसिरिजमध्ये एक रिअल लाइफ कपल झळकणार असल्याची चर्चा आहे.

Ragini MMS Returns: Lovebirds Divya Agarwal & Varun Sood bagged lead roles in ALTBalaji's show? | रागिणी एमएमएस रिटर्न्समध्ये झळकणार दिव्या अग्रवाल आणि वरुण सुद?

रागिणी एमएमएस रिटर्न्समध्ये झळकणार दिव्या अग्रवाल आणि वरुण सुद?

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्या अग्रवाल आणि वरुण सुद या दोघांनी या वेबसिरिजसाठी चित्रीकरण देखील करायला सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे.

एकता कपूरच्या बालाजी टेलिफ्लिम्सची निर्मिती असलेला रागिणी एमएमएस हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य पाहाताना अंगावर काटा येतो. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा सिक्वल रागिनी एमएमएस 2 प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटावर आधारित एक वेबसिरिज देखील अल्टबालाजीवर दाखवण्यात आली होती. यात करिश्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ता ही हॉट जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. सिद्धार्थ हा प्रसिद्ध निर्माता विकास गुप्ताचा भाऊ आहे. आता या बेससिरिजचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसिरिजमध्ये एक नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

अल्ट बालाजीच्या या वेबसिरिजच्या नव्या सिझनमध्ये एक रिअल लाइफ कपल झळकणार असल्याची चर्चा आहे. एमटिव्हीवरील अॅक ऑफ स्पेस या कार्यक्रमाच्या दरम्यान दिव्या अग्रवाल आणि वरुण सुद हे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या वेबसिरिजमध्ये ते दोघे मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. या दोघांनी या वेबसिरिजसाठी चित्रीकरण देखील करायला सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. दिव्या आणि वरुण हे दोघेही या वेबसिरिजद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहेत. त्यामुळे हे दोघेही या त्यांच्या नव्या प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक आहेत.

वरुण आणि दिव्या हे दोघे नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिले आहेत. बिग बॉस 11 या कार्यक्रमात त्या दोघांचे पूर्व जोडीदार प्रियांक शर्मा आणि बेनाफ्सा सोनावाला यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान ते दोघे आपल्या जोडीदाराला फसवत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले होते. 

रागिणी एमएमएस या चित्रपटात राजकुमार राव आणि कैनाझ मोतीवाला यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले होते. तसेच समीक्षकांनी देखील या चित्रपटाची स्तुती केली होती. य चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा सिक्वल रागिनी एमएमएस 2 प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटात सनी लियोनी मुख्य भूमिकेत होती.या चित्रपटाला देखील प्रेक्षकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

 

Web Title: Ragini MMS Returns: Lovebirds Divya Agarwal & Varun Sood bagged lead roles in ALTBalaji's show?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.