Warning! रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर आहे डेंजर... हॉरर, सेक्स सीनचा आहे भडिमार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 02:43 PM2019-05-11T14:43:45+5:302019-05-11T14:45:27+5:30

सनी लियोनी आणि करिश्मा शर्मानंतर आता दिव्या अग्रवाल नवीन रागिणी बनली असून रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 मध्ये तिच्या नायकाच्या भूमिकेत वरुण सुद दिसणार आहे.

Ragini MMS Returns 2 Promo: Divya Agarwal and Varun Sood leave little to our imagination in this horrex drama | Warning! रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर आहे डेंजर... हॉरर, सेक्स सीनचा आहे भडिमार

Warning! रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर आहे डेंजर... हॉरर, सेक्स सीनचा आहे भडिमार

googlenewsNext
ठळक मुद्देदिव्या आणि वरुण हे दोघेही या वेबसिरिजद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत असून या टीझरमध्ये आपल्याला त्या दोघांमध्ये रोमान्स आणि सेक्स सीन पाहायला मिळत आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर दिव्या आपल्या अदांनी सनी आणि करिश्माला मागे टाकणार असे नक्कीच वाटते.  

एकता कपूरची रागिणी आता परत आली आहे. एकता कपूरनेच रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 चा टिझर इन्स्टाग्रामवर शेअर केला असून रागिणी एसएमएसच्या आतापर्यंतच्या सगळ्या भागांपेक्षा सगळ्याच जास्त हा भाग हॉरर असणार असल्याचे टीझरवरून लक्षात येत आहे. एवढेच नव्हे तर या सिझनमध्ये पहिल्या सगळ्या भागांपेक्षा खूपच जास्त सेक्स सीनचा भडिमार आहे. 

सनी लियोनी आणि करिश्मा शर्मानंतर आता दिव्या अग्रवाल नवीन रागिणी बनली असून रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 मध्ये तिच्या नायकाच्या भूमिकेत वरुण सुद दिसणार आहे. खऱ्या आयुष्यात वरुण आणि दिव्या नात्यात आहेत. विकास गुप्ताच्या एस ऑफ स्पेस या कार्यक्रमापासून त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. रोडीजच्या नवीन सिझनमध्ये ते होस्टच्या भूमिकेत दिसत आहेत. दिव्या आणि वरुण हे दोघेही या वेबसिरिजद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत असून या टीझरमध्ये आपल्याला त्या दोघांमध्ये रोमान्स आणि सेक्स सीन पाहायला मिळत आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर दिव्या आपल्या अदांनी सनी आणि करिश्माला मागे टाकणार असे नक्कीच वाटते.  

वरुण आणि दिव्या हे दोघे नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिले आहेत. बिग बॉस 11 या कार्यक्रमात त्या दोघांचे एक्स असलेले प्रियांक शर्मा आणि बेनाफ्सा सोनावाला यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या दरम्यान ते दोघे आपल्या जोडीदाराला फसवत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले होते. 

एकता कपूरच्या बालाजी टेलिफ्लिम्सची निर्मिती असलेला रागिणी एमएमएस हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य पाहाताना अंगावर काटा येतो. या चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा सिक्वल रागिनी एमएमएस 2 प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटावर आधारित एक वेबसिरिज देखील अल्ट बालाजीवर दाखवण्यात आली होती. यात करिश्मा शर्मा आणि सिद्धार्थ गुप्ता ही हॉट जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. सिद्धार्थ हा प्रसिद्ध निर्माता विकास गुप्ताचा भाऊ आहे. आता या वेबसिरिजचा नवा सिझन म्हणजेच रागिणी एमएमएस रिटर्न्स 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ही वेबसिरिज देखील अल्ट बालाजीवरच पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Ragini MMS Returns 2 Promo: Divya Agarwal and Varun Sood leave little to our imagination in this horrex drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.