Radhika Aptene 'starrer' Bhaijaan 'starring Salman Khan! | राधिका आपटेने ‘या’ अभिनेत्यावरून भाईजान सलमान खानला डिवचले!

अभिनेत्री राधिका आपटे सध्या नेहा धुपियाच्या ‘बीएफएफएस वीथ वोग’ या शोमुळे चांगलीच चर्चेत आहे. कारण या शोदरम्यान, राधिकाने एकापाठोपाठ एक खुलासे केले असल्याने बी-टाउनमध्ये खळबळ उडाली आहे. याच शोदरम्यान राधिकाने साउथच्या एका सुपरस्टारने गुदगुल्या केल्यामुळे त्याच्या कानशिलात लगावली असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. मात्र आता राधिकाने जे काही वक्तव्य केले, ज्यामुळे भाईजान सलमान खान दुखावला जाऊ शकतो. राधिकाने याच शोमध्ये म्हटले की, रामागोपाल वर्मा यांनी आता चित्रपट निर्मितीतून रिटायर व्हायला हवे. यावेळी राधिकाने भाईजान सलमान खानच्या अगदी जवळ असलेल्या सुरज पंचोलीलाही सल्ला दिला. ज्यामुळे सलमानला राग येण्याची शक्यता आहे. कारण सलमानने सुरजला ‘हीरो’ या चित्रपटातून लॉन्च केले. आता त्यालाच राधिकाने सल्ला दिल्याने हा सलमानसाठीच तिने मारलेला टोमणा असल्याचे म्हटले जात आहे. 

नेहा धुपियाने राधिका आपटेला प्रश्न विचारला की, कोणत्या अभिनेत्याला आपल्या फिटनेसपेक्षा अभिनयावर लक्ष केंद्रित करायला हवे? याचे उत्तर देताना राधिकाने लगेचच सूरज पंचोलीचे नाव घेतले. राधिकाच्या मते, सूरज अजून अभिनयात कच्चा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या फिटनेसपेक्षा अ‍ॅक्टिंगवर अधिक फोकस करायला हवे. 
 

राधिका नुकतीच अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी जेमतेम प्रतिसाद दिला. राधिकाने नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दशरथ मांझी यांच्या ‘माउंटेन मॅन’ या बायोपिकमध्येही काम केले. राधिकाला तिच्या फटकळ स्वभावासाठी ओळखले जाते. ती नेहमीच तिचा कुठलाही मुद्दा अतिशय ठामपणे मांडते. त्यामुळे बºयाचदा ती ट्रोलर्सच्याही निशाण्यावर आली आहे. परंतु राधिकाने याची कधीच चिंता केली नाही. उलट तिने टोलर्सला जशास तसे उत्तर देणे पसंत केले आहे. राधिका आपटे आगामी ‘बाजार’ या चित्रपटात बघावयास मिळत आहे. राधिकाने साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर ‘कबाली’ या चित्रपटात काम केले आहे. 
Web Title: Radhika Aptene 'starrer' Bhaijaan 'starring Salman Khan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.