Radhika Apte quotes, some producers direct the body of the producer in south-west industry | ​राधिका आपटे सांगतेय, दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काही निर्माते थेट करतात शरीरसुखाची मागणी

राधिका आपटेने आज मराठी, बॉलिवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राधिकाच्या करियरमध्ये अनेक अप अँड डाऊन आले आहेत. पण तरीही तिने कधीही हार मानली नाही. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा अनुभव हा खूपच वेगळा असल्याचे राधिका सांगते. दक्षिणेत तर तिने तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत तिने कबाली या चित्रपटात काम केले आहे. पण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कास्टिंग काऊच मोठ्या प्रमाणावर असल्याचा राधिका आपटेने खुलासा केला आहे. तिने सांगितलेल्या अनेक गोष्टी या प्रचंड धक्कादायक आहेत.  
राधिका आपटेने नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. राधिकाने सांगितले आहे की, मी मुंबईत माझे करियर बनवण्यासाठी आली, त्यावेळी अनेक लोक रात्री बेरात्री मला भेटायला बोलवत असत. पण ते मला कशासाठी बोलवत आहेत याची मला चांगलीच कल्पना असल्याने यासाठी मी नकार देत असे. तुम्हाला मी चित्रपटात घेईन, केवळ तुम्ही ऑडिशन द्यायला या असे अनेक जण मला सांगत असत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मला एकदा तर एकाने मला फोन करून सांगितले होते की, तुम्हाला कोणत्याही निर्मात्याला भेटण्याची इच्छा असेल तर त्या निर्मात्यासोबत तुम्हाला क्रोप्रोमाईज करावे लागेल. हे ऐकून मला चांगलाच धक्का बसला होता. त्यावेळी मी त्या व्यक्तीला सांगितले होते की, मला कोणत्याही निर्मात्याला भेटण्याची इच्छा नाहीये. पण भविष्यात मी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांच्यासोबत मला अशा कोणत्याच गोष्टींचा सामना करावा लागला नाही. 
दक्षिण इंडस्ट्रीत तर अनेक धक्कादायक गोष्टी मी अनुभवल्या आहेत. दक्षिणेतील चित्रपटात तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्हाला निर्मात्यासोबत शारीरिक संबंध ठेवावा लागेल असे काही निर्माते थेट सांगतात. पण मी या सगळ्या गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नाही. मी केवळ माझ्या मेहनतीच्या जोरावर आजवर यश मिळवले. 

Also Read : डान्स शिकता-शिकता राधिका आपटे पडली प्रेमात, गुपचुप जाऊन केले होते लग्न !
Web Title: Radhika Apte quotes, some producers direct the body of the producer in south-west industry
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.