Race 3 Selfish Song: Bobby's entry in Salman-Jacqueline's Lovestory; Smoke on the internet! | Race 3 Selfish Song : सलमान-जॅकलीनच्या लव्हस्टोरीमध्ये बॉबीची एंट्री; इंटरनेटवर धूम!

ईदनिमित्त प्रदर्शित होणाºया सुपरस्टार सलमान खानच्या ‘रेस-३’चे दुसरे गाणे ‘सेल्फिश’ आज प्रदर्शित करण्यात आले आहे. या नव्या गाण्यात जॅकलीन फर्नांडिस सलमान आणि बॉबी देओलसोबत रोमान्स करताना बघावयास मिळत आहे. हे गाणे प्रदर्शित करताच काही वेळातच इंटरनेटवर वाºयासारखे व्हायरल होताना दिसत आहे. गाण्यातील सलमान, जॅकलीन आणि बॉबीचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच पसंत येत आहे. दरम्यान, गुरुवारी या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर दुसºया दिवशी म्हणजेच शुक्रवारी या गाण्याचा संपूर्ण आॅडिओ व्हर्जन प्रदर्शित करण्यात आला. वास्तविक गुरुवारीच ‘गाना डॉट कॉम’वर हे संपूर्ण गाणे प्रदर्शित केले होते.या गाण्याचे वैशिष्ट्ये म्हणजे गाण्याचे लिरिक्स सलमान खानने लिहिले आहे, तर त्यास आतिफ असलम आणि सलमान खानची कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरने आवाज दिला आहे. दरम्यान, ‘रेस-३’च्या ‘हीरिए’ या पहिल्या गाण्याने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. या गाण्याला यू-ट्यूबवर आतापर्यंत दोन कोटी ६० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दीप मनी आणि नेहा भिसनच्या या गाण्याला मीत ब्रदर्सनी म्यूझिक दिले आहे. ‘हीरिए’मध्ये जॅकलीनचा अंदाज बघण्यासारखा आहे. सलमानसोबतची तिची केमिस्ट्री चांगलीच रंगताना दिसत आहे. सलमान आणि जॅकलीन ही जोडी ‘किक’मध्ये बघावयास मिळाली होती. या चित्रपटातील ‘जुम्मे की रात’ हे गाणे आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. दरम्यान, ‘रेस-३’मध्ये सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शाह आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ईदनिमित्त १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Race 3 Selfish Song: Bobby's entry in Salman-Jacqueline's Lovestory; Smoke on the internet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.