आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:43 PM2019-05-03T13:43:51+5:302019-05-03T13:45:48+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे.

r k studios sold to godrej properties | आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी!

आर. के. स्टुडिओच्या जागेवर उभे राहणार आलिशान फ्लॅट्स! गोदरेज प्रॉपर्टीजची मालकी!

googlenewsNext
ठळक मुद्देशो मॅन राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओने चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक क्लासिक चित्रपटांचा साक्षीदार राहिलेला आर. के. स्टुडिओवरची कपूर कुटुंबाची मालकी आता संपुष्टात आली आहे. होय, ७० वर्षांचा वैभवी काळ अनुभवणा-या आर. के. स्टुडिओची वास्तू आता गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतली आहे. नुकतीच गोदरेज प्रॉपर्टीजने हा स्टुडिओ खरेदी केल्याची अधिकृत घोषणा केली. येत्या काळात आर. के. स्टुडिओच्या जागी आलिशान फ्लॅट्स बांधले जाणार आहेत. आर. के. स्टुडिओच्या ३३,००० वर्ग मीटर क्षेत्रात आधुनिक निवासी अपार्टमेंट बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती  गोदरेज प्रॉपर्टीजने दिली आहे.
रणधीर कपूर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आर. के. स्टुडिओच्या जागवेवर  नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


गतवर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर ‘सुपर डान्सर’या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटवर शॉर्ट सर्किटमुळे  आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागात ही आग पसरली होती. या आगीत अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्या होत्या. ऋषी कपूर यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. यानंतर काहीच महिन्यांत हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबाने घेतला होता.
 आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही. आता हा स्टुडिओ विकणं योग्य ठरेल असा निर्णय आम्ही सवार्नुमते घेतला, असे यादरम्यान ऋषी कपूर यांनी स्पष्ट केले होते.
शो मॅन राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओने चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला. १९५१ मध्ये मधला आवारा, १९५३ मध्ये आलेलाआग,१९५५ मधला श्री 420, त्यानंतर आलेले जागते रहो, जिस देश मे गंगा बहती है,सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, हिना,प्रेम ग्रंथ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते. पण आगीत हे सगळे कॉस्च्युम भस्म झालेत.  

Web Title: r k studios sold to godrej properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.