The question that Jenelia had asked Riteish at the first meeting of Riteish Deshmukh and Genelia D'Souza ... | ​रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझाच्या पहिल्या भेटीत जेनेलियाने रितेशला विचारला होता हा प्रश्न... प्रश्न ऐकून रितेशला बसला होता आश्चर्याचा धक्का

तुझे मेरी कसम हा रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसोझाचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला आज १५ वर्षं पूर्ण झाली आहेत. रितेशनेच ट्वीट करून त्याच्या या डेब्युट चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांना आठवण करून दिली आहे. रितेशने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तुझे मेरी कसम या चित्रपटाने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. या चित्रपटामुळे एक आर्किटेक्ट अभिनेता बनला आणि माझी सहकलाकार माझी बायको बनली. या चित्रपटासाठी मी दिग्दर्शक विद्या भास्कर आणि निर्माते रामोजी राव यांचा आयुष्यभर ऋणी आहे. माझे नाव या चित्रपटासाठी सुचवल्याबद्दल सिनेमोटोग्राफर कबीर लाल सर यांचे आभार. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी मी एका मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्याने जेनेलिया माझ्याशी जवळजवळ दोन दिवस बोललीच नव्हती. जेनेलियाने मला भेटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा कोणता प्रश्न विचारला होता ते आजही माझ्या लक्षात आहे. तुझी सिक्युरीटी कुठे आहे असे तिने मला विचारले होते. तिच्या या प्रश्नावर मला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावर मला सिक्युरिटी नसते असे मी तिला उत्तर दिले होते. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.  
जेनेलिया आणि रितेशच्या प्रेमप्रकरणाला तुझे मेरी कसम या चित्रपटापासून सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबादमध्ये सुरू असल्याने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला होता. चित्रीकरण संपल्यावर मुंबईत परतल्यावर ते दोघे एकमेकांना मिस करू लागले. एकमेकांना भेटण्याची ते संधीच शोधत असत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे त्या दोघांना देखील कळले नव्हते. जेनेलिया आणि रितेश यांचे अफेअर सुरू झाल्यानंतर त्यांना लगेचच लग्न करायचे होते. पण रितेशनचे वडील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुरुवातीला रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला विरोध होता. जेनेलिया ही ख्रिश्चन तर रितेश हा हिंदू असल्याने विलासरावांना हे लग्न मान्य नव्हते. पण काही काळांनी त्यांचा विरोध मावळला आणि रितेश आणि जेनेलिया यांचे लग्न धुमधडाक्यात झाले. त्या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही पद्धतीने विवाह केला. 

Also Read : जेनेलिया देशमुखने रितेश देशमुखला दिले वाढदिवसाला हे खास गिफ्ट
Web Title: The question that Jenelia had asked Riteish at the first meeting of Riteish Deshmukh and Genelia D'Souza ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.