Punjabi actress simran kaur mundi escaped from snake bite, viral video stunned you | विषारी सापाला गळ्यात लटकवणाऱ्या अभिनेत्रींसह घडलं असं काही की पाहून अंगावर काटा येईल
विषारी सापाला गळ्यात लटकवणाऱ्या अभिनेत्रींसह घडलं असं काही की पाहून अंगावर काटा येईल

सिमरन कौर मुंडी ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. २००८ साली मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकणाऱ्या सिमरनची पंजाबमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. सिमरन सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. अभिनयात नंबर वन असणारी सिमरन खतरों के खिलाडीसुद्धा आहे हे तुम्हाला तिच्या सोशल मीडियावरील नव्या व्हिडीओवरुन वाटेल. या व्हिडिओमध्ये सिमरनच्या हातात एक साप पाहायला मिळतो आहे. एका विषारी सापाने तिच्या गळ्याभोवती वेटोळे घातल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. गारुड्याने या सापाचं तोंड दाबून धरल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. काही वेळानंतर हा गारुडी अभिनेत्री सिमरनच्या हातात हा साप देतो. हा साप सिमरनला दंश करणार इतक्यातच तो गारुडी या सापाला आपल्याकडे खेचून घेतो. सिमरननं हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. साप कशारितीने दंश करणार होता असं कॅप्शनसुद्धा तिने या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ नक्कीच पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आणेल.

">


 


Web Title: Punjabi actress simran kaur mundi escaped from snake bite, viral video stunned you
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.