Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, या अ‍ॅपच्या मदतीने जमवले ७ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 05:20 PM2019-02-17T17:20:12+5:302019-02-17T17:20:41+5:30

अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अ‍ॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केले आहे.

Pulwama Attack: Akshay Kumar, who helped him to help the family of Shahid's family, got Rs 7 crore | Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, या अ‍ॅपच्या मदतीने जमवले ७ कोटी रुपये

Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, या अ‍ॅपच्या मदतीने जमवले ७ कोटी रुपये

googlenewsNext


काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. . या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहेच. शिवाय शहीदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे अक्षय कुमार.

अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अ‍ॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केलं आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार अक्षयने केवळ दिड दिवसात सात कोटी रुपये जमवले आहेत. खुद्द अक्षयने या फंडमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. अक्षयने ज्या वेबसाईट आणि अ‍ॅपच्या माध्यमातून ही मदत केली आहे. त्याचे नाव आहे भारत के वीर.  या अ‍ॅपची सुरुवात अक्षयने २०१७मध्ये केली होती.

त्यावेळी अक्षय म्हणाला होता की तो सरकारच्या मदतीने  जवान आणि त्यांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदतीचं करण्यास कटिबद्धा आहे. त्यातूनच वीर अ‍ॅपचा जन्म झाला होता. या अ‍ॅपमध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या सहाय्याने कोणतंही ट्रान्सफर शुल्क न आकारता पैसे शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. पीपिंगमूनदेखील वाचकांना अपील करत आहे की, पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांच्या परिवारांसाठी जास्तीत जास्त पुढे येऊन मदत करावी.

Web Title: Pulwama Attack: Akshay Kumar, who helped him to help the family of Shahid's family, got Rs 7 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.