Pulakit emperor and Yami Gautam's grand death | पुलकित सम्राट आणि यामी गौतमचे नातं संपुष्टात

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते पुलकित सम्राट आणि यामी गौतमचे.   

मीडिया रिपोर्टनुसार, दोघांचे नातं संपुष्टात आले आहे. मात्र अद्याप यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. ऐवढेच नाही तर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलोदेखील केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामीच्या कुटुंबीयांना ती एक विवाहीत अभिनेत्याला डेट करते आहे ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. यामीने आपल्या आई-वडिलांचे म्हणणे ऐकून पुलकितशी नातं तोडल्याची चर्चा आहे.शिमलामध्ये 'सनम रे'च्या शूटिंग दरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करण्याची सुरुवात केली.पुलकितची पूर्व पत्नी श्वेता हिने पुलकित आणि तिच्या घटस्फोटाचे कारण यामी असल्याचे सांगितले होते.  

काही दिवसांपूर्वी पुलकित सम्राट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री कृती खरबंदा यांचा 'वीरे की वेडिंग' हा चित्रपट रिलीज झाला होता. यात पुलकितच्या मोठ्या भावाची भूमिका जिमी शेरगीलने साकारली होती.मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला. तर यामी सध्या 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.यात ती वकिलाची भूमिका साकारणार आहे. यातील भूमिकेसाठी ती  हिंदी साहित्यचा अभ्यास करते आहे. यामीसह यात शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूरची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाची शूटिंग उत्तराखंडमध्ये सुरु आहे. श्री नारायण सिंग दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग यानंतर मसूरी आणि ऋषिकेशलासुद्धा शूटिंग केले जाणार आहे. यात शाहिद एका वकिलाची भूमिकेत दिसणार आहे जो वीज कंपनीच्या विरोधात लढत असतो. या भूमितेसाठी शाहिद गढवाली भाषा शिकतो आहे.
 


 
Web Title: Pulakit emperor and Yami Gautam's grand death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.