पूजा हेगडेला मिळाली साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटात एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 03:24 PM2018-07-02T15:24:14+5:302018-07-02T15:30:19+5:30

आशुतोष गोवारिकर यांच्या मोहेंजो-दारोमधून पूजा हेगडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिवसांदिवस पूजाची लोकप्रियता वाढत चालली आहे.

Puja Hegde gets entry in Sajid Nadiadwala's film | पूजा हेगडेला मिळाली साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटात एंट्री

पूजा हेगडेला मिळाली साजिद नाडियाडवालाच्या चित्रपटात एंट्री

googlenewsNext
ठळक मुद्देहा चित्रपट पुर्नजन्माच्या कथेवर आधारित आहे2019 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

आशुतोष गोवारिकर यांच्या मोहेंजो-दारोमधून पूजा हेगडेनेबॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिवसांदिवस पूजाची लोकप्रियता वाढत चालली आहे. ऋतिक रोशनपासून तेलुगूमधील सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत काम केले आहे. आता तिला साजिद नाडियाडवालांनी साईन केले आहे. 

पूजा हेगडे साजिद नाडियाडवालांच्या 'हाऊसफुल 4'मध्ये दिसणार आहे. यात आधीच्या हाऊसफुलच्या सिरिजमध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बोमन ईरानी यांनी काम केले आहे. 'हाऊसफुल 4'च्या माध्यमातून पहिल्यांदाच पूजा कॉमेडी जॉनरमध्ये एंट्री घेते आहे. सध्या या गोष्टीला घेऊन पूजा नर्वस आणि उत्साहितदेखील आहे कारण तिला अक्षय कुमार आणि रितेश देशमुखसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत बोलताना पूजा म्हणाली, ''हा माझा पहिला कॉमेडी चित्रपट आहे. यात मी माझ्या अभिनयाचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे.'' पूजाच्या म्हणण्यानुसार प्रेक्षकांना हसवणे सगळ्यात कठिण असते. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने ती खूपच उत्सुक आहेत.   

पूजा म्हणाली मी खूप खूश आहे कारण मला अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करायला मिळणार आहे. हाऊसफुल सिरिजचे आतापर्यंत आलेले सगळे चित्रपट हिट गेले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या सिरिजने चांगला गल्ला जमावला आहे. हा चित्रपट पुर्नजन्माच्या कथेवर आधारित आहे. 2019 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि डायलॉग लिहिण्याचे काम प्रसिद्ध लेखक फरहाद समजी करणार आहे. आतापर्यंत फरहादने आपला भाऊ साजिद सोबत मिळून अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. हाऊसफुल सिरीजचा शेवटचा चित्रपट देखील  साजिद- फरहादने मिळून दिग्दर्शित केला होता. आता दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले आहेत.   

Web Title: Puja Hegde gets entry in Sajid Nadiadwala's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.