Proof of Ajay Devgn and Aamir Khan's friend | अजय देवगण आणि आमिर खानच्या मैत्रिचा हा पुरावा

या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर अजय देवगण आणि आमिर खानच्या चित्रपटांचा सामाना होणार आहे. अजय देवगणचा गोलमाल अगेन आणि आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय देवगणच्या चित्रपटाच्या एक दिवस आधी प्रदर्शित होतोय. त्यामुळे साहजिकच दोघांमध्ये स्पर्धा होणे अपेक्षित आहे. मात्र चित्रपटाच्या स्पर्धेचा विचार न करता या दोन्ही कलाकारांनी एकमेकांची आनंदाने भेट घेतली आहे. दोघांनी या भेटीदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आमिर खाने यांनी अजय देवगणची स्तुती करताना त्याला महान व्यक्ती म्हटले आहे. आमिरने ट्वीट करत लिहिले आहे की, ''खूप दिवसांनी अजय देवगणची भेट घेतली. तो एक महान व्यक्ती आहे.'' तर अजयने सुद्धा आमिर खानला चित्रपटासाठी विश केले आहे.अजयने लिहिले आहे, चांगली लोक नेहमीच जिंकतात.  अजय आणि आमिरच्या जोडी इश्क चित्रपट दिसली होती. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील आवडली होती. इश्कनंतर बऱ्याच वर्षांनी दे दोघं एकत्र दिसले. तब्बल सात वर्षांनंतर रोहित शेट्टी गोलमाल 4 हा चित्रपट घेऊन येतो आहे. यात अजय देवगण,श्रेयस पळपदे, कुणाल खेमू, तुषार कपूर, अर्शद वारसी, परिणीती चोप्रा आणि तब्बूची मुख्य भूमिका आहे. गोलमाल सीरिजचे याआधी आलेले तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होतो. त्यामुळे या चित्रपटाची वाट प्रेक्षक कधी पासून बघतायते. तर आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ झायरा वसीमची मुख्य भूमिका आहे.. सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाची कथा एका छोट्या मुलीच्या सिंगिंग करिअरवर आधारित आहे. तिला तिचा आवाज जगासमोर पोहोचवायचा असतो; मात्र वडिलांचा विरोध असल्यामुळे तिला याकरीता लढा द्यावा लागतो. तेथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. पुढे ती सुपरस्टार बनते. या छोट्या मुलीच्या भूमिकेत जायरा वसीम बघावयला मिळणार आहे. तर यात आमीर खान चित्रपटात सुपरस्टारच्या भूमिकेत असून, त्याचे नाव शक्ती असते. प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला पसंतीचा कौल देतायेत हे लवकरच कळेल. 

Web Title: Proof of Ajay Devgn and Aamir Khan's friend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.