प्रियंका म्हणाली, 'हाच तो क्षण होता जेव्हा मी निकच्या प्रेमात पडले"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:51 AM2019-05-23T10:51:30+5:302019-05-23T11:02:37+5:30

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधले प्रसिद्ध कपल आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले.

Priyanka said, that was the momment when i fall in love with nick | प्रियंका म्हणाली, 'हाच तो क्षण होता जेव्हा मी निकच्या प्रेमात पडले"

प्रियंका म्हणाली, 'हाच तो क्षण होता जेव्हा मी निकच्या प्रेमात पडले"

googlenewsNext
ठळक मुद्दे''निकचे करिअर हे माझ्या करिअरपेक्षा खूप मोठे आहे''प्रियंकाचा ‘स्काय इज पिंक’ बॉलिवूड सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधले प्रसिद्ध कपल आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले. लग्न झाल्यापासून प्रियंका आणि निकचे नातं कोणत्याना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले आहे. 


एक इंटरव्हु दरम्यान प्रियंकाने निक जोनाससोबतच्या नात्याबाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला. नेमकी अशी कोणती गोष्ट होती जी पाहुन प्रियंका निकच्या प्रेमात पडली. प्रियंका म्हणाली, ''निकचे करिअर हे माझ्या करिअरपेक्षा खूप मोठे आहे. जवळपास 20 ते 21 वर्ष तो काम करतोय. त्यामुळे निक आमच्या दोघांच्या करिअरचे महत्त्व समजतो. त्याच्या फॅमिलीने निकच्या करिअरसाठी केलेल्या त्यागाची जाणीव त्याला आहे. हीच ती गोष्ट होती ज्यामुळे मी निकच्या प्रेमात पडले.''     


''आमची ही दुसरी किंवा तिसरी डेट होती. मी लॉस एंजिलेसमध्ये मीटिंग करत होते. यादरम्यान माझी भारतातली आणि अमेरिकेतील टीम होती. आम्ही मित्रांसोबत बोटवर लंट डेट करत होतो. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता  मी मीटिंग कॅन्सल करण्याच्या मुडमध्ये होते. पण निकने मला किनाऱ्यावर नेऊन समजवले कि ज्याठिकाणा आज तू पोहोचली आहेस हे सगळं मिळवण्यासाठी तू खूप मेहनत केली आहेस. मी मित्रांसोबत डिनरला जातो तू जाऊन तुझं काम संपवून ये आणि परत आम्हाला ज्वॉईन कर. त्यावेळी मला कळलं की निक माझी केवढी काळजी घेतो ते.''  


वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर प्रियंकाचा  ‘स्काय इज पिंक’ बॉलिवूड सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका चोप्रा फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Web Title: Priyanka said, that was the momment when i fall in love with nick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.