Priyanka gets marriage proposal on red carpet! | ​ रेड कार्पेटवर प्रियांकाला मिळाला लग्नाचा प्रस्ताव!

हॉलिवूड जगतात सध्या प्रियांका चोप्राचाच जलवा आहे. इतका की, रेड कार्पेटवर तिला लग्नाचे प्रस्ताव मिळू लागले आहेत. यंदाच्या नामांकित एमी अवार्डमध्ये प्रियांका सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरली. शिफॉनचा लाल गर्द रंगाचा वन शोल्डर गाऊन आणि ओठांवर तितकीच लालचुटूक लिपस्टिक अशा हॉट अवतारात प्रियांका एमी अवार्डच्या रेड कार्पेटवर अवतरली आणि अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढले. जॅसन वू याने डिझाईन केलेल्या या गाऊनसोबतच प्रियांकाने केसांची पोनीटेल बांधलेली होती. रेड कार्पेटवर येताच सगळ्यांच्या नजरा प्रियांकावर खिळल्या. याचवेळी गर्दीतील एका चाहत्याने प्रियांकाला लग्नाची गळ घातली. ‘मॅरी मी’ असा हा चाहता जोराने ओरडला. प्रियांकानेही या चाहत्याला निराश न करता ‘could’,असे उत्तर दिले. यानंतर प्रियांका नुसती हसत सुटली. रेड कार्पेटवरील प्रत्येक क्षण तिने मनापासून जगला. तुम्हाला पाहायचे तर मग हा व्हिडिओ पाहाच!!
Web Title: Priyanka gets marriage proposal on red carpet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.