Priyanka Chopra's career was spoiled due to Bobby Deol, but ...? | बॉबी देओलमुळे प्रियांका चोप्राचे करिअर झाले असते उद्ध्वस्त, पण...?

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या विदेशी लव इंट्रेस्टमुळे चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की, ती तिच्या वयापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन अभिनेता तथा गायक निक जोनस याला डेट करीत आहे. या व्यतिरिक्त प्रियांका तब्बल दोन वर्षांनी ‘भारत’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करीत आहे. या चित्रपटात ती अभिनेता सलमान खानसोबत बघावयास मिळणार आहे. 

दरम्यान, प्रियांकाने अभिनेता सनी देओल आणि प्रीती झिंटाच्या ‘हीरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ती सेकंड लीड होती. आता प्रियांका इंटरनॅशनल स्टार बनली आहे. गुणवत्तेच्या आधारे तिने हे स्थान मिळविले आहे. मात्र डेब्यू चित्रपटाअगोदर प्रियांकाला बºयाचशा चित्रपटांच्या आॅफर्सनी हुलकावणी दिली. ज्याचे तिला आजही दु:ख वाटते. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाची बायोग्राफी समोर आली. ज्यास पत्रकार भारती प्रधानने लिहिले. या पुस्तकाचे नाव ‘प्रियांका चोप्रा : द डार्क हॉर्स’ असे आहे. पुस्तकात प्रियांकाच्या करिअरच्या जर्नीबद्दल सांगण्यात आले आहे. सर्वात अगोदर प्रियांकाला विजय गलानीचा एक चित्रपट आॅफ करण्यात आला होता. चित्रपटाचे नाव तोपर्यंत निश्चित करण्यात आले नव्हते. 

या चित्रपटास महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. चित्रपटात प्रियांकासोबत बॉबी देओलला कास्ट करण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी निर्माते गलानी प्रियांकाला भेटण्यासाठी तिच्या मेकअप व्हॅनमध्ये पोहोचले होते. त्यावेळी प्रियांकाचे मॅनेजर प्रकाश जाजू हेदेखील त्याठिकाणी उपस्थित होते. विजय गलानी यांनी पुस्तकात सांगितले की, त्यावेळी प्रियांकाने लंडनमध्ये नाकाची सर्जरी केली होती. त्यामुळे तिचे नाक काहीसे विचित्र वाटत होते. गलानीला तिला बघून विश्वासच झाला नाही. चित्रपटाची काहीशी शूटिंग झाली होती. त्यानंतर लंडनमध्ये शूटिंगचे लॉन्ग शेड्यूल होते. 

त्यावेळी गलानी यांनी म्हटले होते की, ज्या अभिनेत्रीचे नाकच व्यवस्थित नाही, तिच्यासोबत आपण शूटिंग कशी करू शकतो? मात्र अशातही प्रियांकाला विश्वास होता की, तिचे नाक एक महिन्यात ठीक होईल. एक महिना संपला तरीसुद्धा नाकाची समस्या कायम होती. त्याचबरोबर बॉबी देओलनेही प्रियांकाचा विचित्र लूक बघून तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. तसेच पैसे परत करण्याबाबतही त्याच्याकडून विचार केला गेला. त्यातच त्यावेळी महेश मांजरेकरचे चित्रपटही फ्लॉप ठरत होते. त्याची मार्केट व्हॅल्यू पूर्णपणे डाउन झाली होती. अशात त्याचा आणखी एक चित्रपट थांबला. प्रियांकाला तर तिच्या नाकामुळे एक दोन नव्हे तर तब्बल आठ चित्रपटांनी हुलकावणी दिली होती. 

पुढे ही बातमी बॉलिवूडमध्ये अशी काही पसरली की, बॉबीप्रमाणे कोणताही अभिनेता तिच्यासोबत काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार देत होता. बॉबीचा नकार प्रियांकासाठी चांगलाच डोकेदुखी ठरला. कारण पुन्हा तिला बॉलिवूडमध्ये उभे राहण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला. 
Web Title: Priyanka Chopra's career was spoiled due to Bobby Deol, but ...?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.