Priyanka Chopra's alleged boyfriend Nick Jonas met her mother ... Priyanka's fancy will get good news soon? | ​प्रियांका चोप्राचा कथित बॉयफ्रेंड निक जोनास भेटला तिच्या आईला... प्रियांकाच्या फॅन्सना लवकरच मिळणार गुड न्यूज?

प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत भारतात येणार अशा गेल्या कित्येक दिवसांपासून बातम्या येत होत्या. आता तर तो मुंबईत दाखल झाला असून प्रियांका आणि निक डिनर डेटला देखील गेले होते. वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समधील एका हॉटेलच्या बाहेर त्या दोघांना एकत्र पाहाण्यात आले. यावेळी निक आणि प्रियांका हातात हात घालून असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर या डिनर डेटला प्रियांकाच्या आई मधू चोप्रा देखील उपस्थित होत्या.
निकची भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. निक खास प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना भेटण्यासाठी मुंबईत आला असल्याचे म्हटले जात आहे. निकने आता तिच्या आईची भेट घेतल्यानंतर प्रियांकाच्या फॅनना काहीतरी गूड न्यूज नक्कीच मिळेल अशी त्यांना आशा आहे.
गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निक जोनस याच्याशी प्रियांकाचे नाव जोडले जात आहे, तर प्रियांकाकडून अद्याप तरी त्यांच्या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. गेल्या आठवड्यात प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये केमिस्ट्री बघावयास मिळाली. अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता. यानंतर प्रियांका आणि निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका आणि निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नव्हती. 
२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका आणि निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका, निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहणार, अशा देखील बातम्या आल्या होत्या. प्रियांका निकपेक्षा बरीच मोठी आहे. त्याअर्थाने ती आपल्यापेक्षा अधिक प्रगल्भ आहे, असे निकचे मानने आहे. एकंदर काय तर प्रियांका आणि निकच्या रिलेशनशिपच्या बातम्या आता बऱ्याच अंशी खऱ्या वाटू लागल्या आहेत. येत्या काळात या नात्याचे बंध किती दृढ होतात, ते आपण बघूच.

Also Read : पुढील वर्षी जगापुढे येणार प्रियांका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ गोष्टी!!
Web Title: Priyanka Chopra's alleged boyfriend Nick Jonas met her mother ... Priyanka's fancy will get good news soon?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.