Priyanka Chopra unveiled her honeymoon plan | प्रियांका चोप्राने उलगडला तिच्या हनीमूनचा बेत
प्रियांका चोप्राने उलगडला तिच्या हनीमूनचा बेत

ठळक मुद्देप्रियांका म्हणाली सध्या हनीमून प्लान नाही

 अभिनेत्री प्रियांका चोप्रानिक जोनास यांचा रॉयल विवाह सोहळा नुकताच पार पडला. मात्र सगळीकडे सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. नुकतेच प्रियांका व निक एका इव्हेंटला आले होते. खरेतर प्रियांकाने डिजिटल इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्यावेळी तिने प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी प्रियांकाने आपल्या हनीमून प्लानबद्दल सांगितले.

प्रियांका चोप्रा रिसेप्शन पार्टीनंतर कामात व्यग्र झाली आहे. तिचे म्हणाली की, सध्या मी काहीही प्लान केला नाही. कारण मी माझ्या वर्क कमिटमेंट पूर्ण करण्यात लागली आहे. पण, माझा नवरा निकने स्पेशल प्लान बनवला आहे आणि माझ्यासाठी ते मोठे सरप्राईज असणार आहे. 
प्रियांका चोप्राने हनीमूनबद्दल पुढे सांगितले की, मला सर्व वधूंना एक गोष्ट सांगायची आहे की त्यात तुमची मर्जी असली पाहिजे. जर तुम्हाला काम करायचे असेल तर काम करा. जर हनीमूनला जायचे असेल तर तिथे जा. जर तुम्हाला काहीही करायचे नसेल तर तेही योग्य आहे. कारण तुम्ही ब्राइड आहात आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्या मर्जीने व्हायला पाहिजेत. 

गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांकाला घ्यायला निक अगदी घोडीवरून वाजतगाजत आला.त्यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, हे सांगणे नकोच. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 


Web Title: Priyanka Chopra unveiled her honeymoon plan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.