Priyanka Chopra shares bridal show in Britain! | प्रियांका चोप्राने ब्रिटनमधील शाही लग्नातील फोटो केला शेअर!

आज संपूर्ण जगाचे लक्ष ब्रिटन येथील शाही लग्नाकडे आहे. मात्र भारतीयांचे लक्ष प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांच्या रॉयल वेडिंगपेक्षा प्रियांका चोप्रा हिच्याकडे आहे. त्यास कारणही तसेच आहे. माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी या ऐतिहासिक लग्नाची साक्षीदार बनणार आहे. तिला या लग्नासाठी विशेष निमंत्रण असून, त्यासाठी ती लंडन येथे पोहोचली आहे. लग्न घरी प्रियांका खूपच मौजमस्ती करताना दिसत आहे. तिने याबाबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यामध्ये नवरीच्या मैत्रिणींसोबत ती हसताना दिसत आहे. आता प्रियांकाला या लग्नासाठी आमंत्रित करण्याचे कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. प्रियांका मेघन मार्कलची चांगली मैत्रिण असल्यानेच, तिला या ऐतिहासिक लग्नासाठी आमंत्रित केले आहे. प्रियांका आणि मेघनची पहिली भेट जानेवारी २०१६ मध्ये ‘एली’ या साप्ताहिकाकडून आयोजित केलेल्या एका इव्हेंटदरम्यान झाली होती. त्यावेळी प्रियांका ‘क्वांटिको’ या मालिकेत काम करीत होती. या इव्हेंटदरम्यान झालेल्या भेटीनंतर मेघनने तिच्या लाइफस्टाइल ब्लॉगसाठी प्रियांकाची मुलाखतही घेतली होती. त्यानंतर दोघी बºयाच ठिकाणी बघावयास मिळाल्या होत्या. त्यांचे सेल्फी आजही व्हायरल होत आहेत. दोघींनी वेळोवेळी इन्स्टाग्रामवर त्यांचे फोटोही शेअर केले आहे. दोघींच्या मैत्रीची चर्चा माध्यमांमध्येही वेळोवेळी रंगली आहे. 
 

दरम्यान, प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांनी त्यांच्यातील नात्याबद्दल या अगोदरच अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. बºयाचदा तर प्रियांकाला या दोघांच्या नात्यांविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. यावरून याबाबतचा अंदाज लावता येऊ शकतो की, मेघन आणि प्रियांकामध्ये किती घट्ट मैत्री आहे. नुकतेच प्रियांका चोप्राने टाइम मॅग्झीनमध्ये मेघन मार्कलसाठी एक इमोशनल लेख लिहिला होता. 
Web Title: Priyanka Chopra shares bridal show in Britain!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.