प्रियांका चोप्रा सध्या एका खास कारणाने चर्चेत आहे. होय, आत्तापर्यंत प्रियांका सिंगल आहे, असेच सर्वांना वाटत होते. पण कदाचित असे नाहीये. या देसी गर्लचा जीव एका ‘फिरंगी बाबू’वर जडला, असे दिसतेय. हा ‘फिरंगी बाबू’ कोण तर अमेरिकन सिंगर निक जोनास अर्थात निकोलस जेरी जोनास. गेल्या काही दिवसांत दोघांमधील जवळीक वाढली आहे. अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला.यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले. या पार्टीत अनेकजण आहेत. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नाही. पार्टीच्या फोटोंमध्ये दोघेही अतिशय जवळ दिसत आहेत.२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. आत्तापर्यंत प्रियांका निकसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या नाकारत आली आहे. पण सध्या दोघांचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ आणि फोटो बघता, दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेचा बाजार गरम आहे.ALSO READ : शाही लग्नाच्या रॉयल रिसेप्शनमध्ये दिसला प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज !

आता या चर्चेत खरंच काही तथ्य असेल तर प्रियांकाचे हृदय चोरणारा हा निक जोनास आहे तरी कोण, हे जाणून घ्यायला हवे. तर निक हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. ८-९ वर्षांचा होता तेव्हापासून निक अभिनय करतोय. यादरम्यान अनेक नाटकांत त्याने अभिनय केला. २००२ मध्ये निकने वडिलांसोबत मिळूल ‘जॉय टू द वर्ल्ड’ नावाचे एक गाणे लिहिले आणि अशाप्रकारे निकने अभिनयाशिवाय संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. निकचे वडीलही एक गीतकार, गायक आणि रंगभूमी कलाकार होते. आई साईन लँग्वेजची टीचर होती़ सोबतच गायिका होती. म्हणजेच अभिनय आणि संगीताचा वारसा निकला घरातूनचं मिळाला होता. २००५मध्ये निकले पॉल केविन जोनास आणि जोसेफ एडम जोनास या दोन भावांसोबत जोनास ब्रदर्स नावाचा पॉप रॉक बँड बनवला. जोनास ब्रदर्सने चार अल्बम रिलीज केले आहेत.
Web Title: Priyanka Chopra really loved American singer? Who is Nick Jonas ??
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.