Priyanka Chopra realizes the reality of closed-door shutdown in Bollywood world, read detailed | बॉलिवूडच्या दुनियेतील बंद दरवाजामागचं वास्तव प्रियांका चोप्राने केले उघड,वाचा सविस्तर

फक्त हॉलिवुडच नाही तर बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींवर लैंगिक अत्याचार होतात असं धक्कादायक गौप्यस्फोट बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केला आहे.हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर सध्या लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होतोय. त्याच्या विरोधात हॉलिवूडमधून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. अँजेलिना जोली, जेनिफर लॉरेन्स, रीझ विदरस्पून, ग्वेनेथ पॅल्ट्रो या अभिनेत्रींनी हार्वेवर टीका केलीय. भारतातही असा हार्वे वेन्स्टाइन आहे का, असा प्रश्न अलिकडेच प्रियांका चोप्राला विचारण्यात आला. तेव्हा बॉलिवूडमध्ये एकच हार्वे वेन्स्टाइन नाहीये. असे हार्वे सगळीकडेच असतात, असं तिनं सांगितलं आहे. मला नाही वाटत की, भारतात फक्त एकच हार्वे आहे किंवा हॉलिवूडमध्ये फक्त हाच एक हार्वे आहे. "प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आहेत, जे महिलांकडून त्यांची शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात.आपल्या क्षेत्रात पुरूषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल असं महिलांना वाटते.त्यांना दुखावलं तर ते आपल्याला वाळीत टाकतील, अशी मनात भीती असते.आपण एकटे पडू यासाठी महिला घाबरतात असं प्रियांकाने म्हटले आहे". हार्वेची ऐश्वर्या रायवर देखील कशी वाईट नजर होती, याचा खुलासा ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक सिमोन शेफील्डनं केलाय. मात्र आता प्रियांकाच्या या धक्कादायक विधानामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचं भूत आलं का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Web Title: Priyanka Chopra realizes the reality of closed-door shutdown in Bollywood world, read detailed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.