Priyanka Chopra reacts on US magazine scam artist article | प्रियांका व निकचे लग्न फसवे या लेखावर प्रियांका चोप्राने दिली अशी प्रतिक्रिया
प्रियांका व निकचे लग्न फसवे या लेखावर प्रियांका चोप्राने दिली अशी प्रतिक्रिया

ठळक मुद्देया सारख्या गोष्टींना मी महत्त्व देत नाही. सध्या मी जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती असून माझा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे तिने म्हटले. एवढेच नव्हे तर या गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत असे देखील तिने सांगितले. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे लग्न आटोपले. दिल्लीतील रिसेप्शनही थाटामाटात पार पडले. पण यादरम्यान एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. ‘द कट’ नामक एका इंटरनॅशनल मॅगझिनने प्रियांकाला global scam artist संबोधले आहे. या मॅगझिनमध्ये प्रियांका आणि निकच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर एक लेख प्रकाशित झाला आहे. या लेखात या मॅगझिनने काही धक्कादायक दावे केले आहेत. होय निकने हे लग्न आपल्या इच्छेविरूद्ध केले, असा दावा या लेखात करण्यात आला केला. या लेखावर प्रियांका चोप्रा काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. 

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने लग्नानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. दिल्लीत एका कार्यक्रमात ते एकत्र आले होते. त्यावेळी ‘द कट’ या मासिकात छापून आलेल्या लेखविषयी प्रियांकाला विचारले असता तिने या लेखावर सडेतोड उत्तर दिले आहे. या सारख्या गोष्टींना मी महत्त्व देत नाही. सध्या मी जगातील सगळ्यात आनंदी व्यक्ती असून माझा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे तिने म्हटले. एवढेच नव्हे तर या गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत असे देखील तिने सांगितले. 

प्रियांका आणि निक यांच्यात खरे प्रेम आहे काय? असे द कट’ मासिकातील लेखाचे शीर्षक आहे. मारिया स्मिथ नामक पत्रकाराने हा लेख लिहिला आहे. या लेखात प्रियांका आणि निक यांचे लग्न ‘फसवे’,‘खोटे’ असल्याचे म्हटले आहे. १००० शब्दांच्या या लेखात निक आणि प्रियांकाचे रिलेशन खोटे असल्याचा दावाही करण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही, तू हा लेख वाचला असशील तर लवकरात लवकर स्वत:ला यातून बाहेर काढ, असा सल्ला निकला देण्यात आला आहे.

हा लेख प्रकाशित झाला आणि सगळीकडे खळबळ माजली. निक आणि प्रियांका दोघांचेही कुटुंब या लेखामुळे संतापले. निकचा मोठा भाऊ जो जोनास याने या लेखाची तीव्र शब्दांत निंदा केली आहे.


Web Title: Priyanka Chopra reacts on US magazine scam artist article
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.