बॉयफ्रेन्ड निक जोनासच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असा होता प्रियांका चोप्राचा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 09:12 AM2018-07-02T09:12:26+5:302018-07-02T09:13:53+5:30

प्रियांका चोप्रा सध्या प्रचंड चर्चेत आणि कारण फक्त एक आहे, ते म्हणजे बॉयफ्रेन्ड निक जोनास. 

priyanka chopra reached brazil with her boyfriend nick jonas in his concert | बॉयफ्रेन्ड निक जोनासच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असा होता प्रियांका चोप्राचा अंदाज!

बॉयफ्रेन्ड निक जोनासच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये असा होता प्रियांका चोप्राचा अंदाज!

googlenewsNext

प्रियांका चोप्रा सध्या प्रचंड चर्चेत आणि कारण फक्त एक आहे, ते म्हणजे बॉयफ्रेन्ड निक जोनास. होय, सध्या दोघांच्याही रिलेशनशिपची जबरदस्त चर्चा आहे. गत आठवडाभर निक व प्रियांका भारतात होते. खास प्रियांकाच्या आई व कुटुंबाला भेटायला निक भारतात आला होता. यादरम्यानही निक व प्रियांकाची केमिस्ट्री दिसली होती. खरे तर प्रियांका व निकने आपल्या या नात्याची अधिकृत कबुली अद्यापही दिलेली नाही. पण दोघांनीही अप्रत्यक्षपणे हे नाते कबुल केले आहे. हातात हात घालून फिरण्यापासून तर सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करण्यापर्यंत असे बरेच काही प्रियांका व निक करताना दिसत आहेत.

तूर्तास प्रियांका निकसोबत ब्राझिलमध्ये आहे. होय, निकने ब्राझिलमध्ये विलामिक्स फेस्टिवलमध्ये परफॉर्म केला. या लाईव्ह कॉन्सर्टला प्रियांकाही हजर होती. 

यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघण्यासारखा होता. संपूर्ण कॉन्सर्टभर ती आपल्या फोन कॅमे-याने निकचे फोटो टिपतांना दिसली. 

केवळ इतकेच नाही तर इन्स्टाग्राम स्टोरी लाईनवर निकच्या कॉन्सर्टची झलक दाखवणारा एक फोटोही तिने शेअर केला. या फोटोसोबत ‘दिलवाला’ इमोजीही टाकला.
प्रियांका व निक यावर्षी अखेरिसपर्यंत साखरपुडा करू शकतात, असे मानले जात आहे. दोघांनीही एकमेकांशी लग्नाचा निर्णय घेतल्याचेही मानले जात आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होते, तेवढेच आता बघायचेयं.

 

Web Title: priyanka chopra reached brazil with her boyfriend nick jonas in his concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.