priyanka chopra is now priyanka chopra jonas | लग्नानंतर ‘या’ नावाने ओळखली जाणार ‘देसी गर्ल’!
लग्नानंतर ‘या’ नावाने ओळखली जाणार ‘देसी गर्ल’!

ठळक मुद्दे गत १ डिसेंबरला प्रियांका व निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले आणि दुस-या दिवशी २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या.

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी  प्रियांका चोप्रा ही नुकतीच अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबेडीत अडकली. आता  प्रियांका अधिकृतपणे अमेरिकेची सून बनली आहे.जोधपूरच्या उमेद भवनात ख्रिश्चन व हिंदू पद्धतील लग्न केल्यानंतर प्रियांका व निक यांनी दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. दिल्लीतील रिसेप्शननंतर कपल मुंबईत परतले आहे. या कपलबद्दलची ताजी खबर म्हणजे, लग्नानंतर प्रियांकाने आपल्या नावात बदल केला आहे. होय, आता ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा जोनास या नावाने ओळखली जाईल.प्रियांकाने आपल्या सोशल मीडया अकाऊंटवरही नाव बदलून प्रियांका चोप्रा जोनास असे केले आहे. प्रियांकाच्या या निर्णयाने निक मनातल्या मनात नक्कीच सुखावला असणार, हे नक्की.


 गत १ डिसेंबरला प्रियांका व निक ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले आणि दुस-या दिवशी २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांका व निकच्या लग्नाचा एकही फोटो लीक झाला नाही. कारण या लग्नाच्या फोटोचे हक्क एका मॅगझिनला विकण्यात आले होते. त्यामुळे लग्नानंतर तिसºया दिवशी लग्नाचे आॅफिशिअल फोटो जारी करण्यात आले.लग्नानंतर प्रियांका लगेच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात दिसणार आहे.  भन्साळींच्या चित्रपटात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते. प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. खरे तर  सुमारे वर्षभरापूर्वी या चित्रपटाबद्दलची बातमी आली होती. भन्साळी आणि प्रियांका या चित्रपटासाठी एकत्र येणार, अशी बातमी होती. त्यानंतर प्रियांकाने हा चित्रपट सोडल्याचीही बातमी आली होती. पण आता प्रियांका या चित्रपटात दिसणार, अशी पक्की खबर आहे.   
 

English summary :
Priyanka has changed her name after the wedding. Yes, now 'Desi Girl' will be known as Priyanka Chopra Jonas. The Priyanka has changed her name to Priyanka Chopra Jonas on her social media account.


Web Title: priyanka chopra is now priyanka chopra jonas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.