प्रियांका चोप्रा-निक जोनासचा असा आहे मुंबईतला रिसेप्शन प्लॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:13 PM2018-12-12T12:13:23+5:302018-12-12T12:25:10+5:30

सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ओमानमध्ये हनीमूनला गेले आहेत. हनीमूनवरुन परतल्यानंतर प्रियांका मुंबईत रिसेप्शन देणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते.  

Priyanka Chopra-Nick Jonas this is the Mumbai's Reception Plan | प्रियांका चोप्रा-निक जोनासचा असा आहे मुंबईतला रिसेप्शन प्लॉन

प्रियांका चोप्रा-निक जोनासचा असा आहे मुंबईतला रिसेप्शन प्लॉन

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियांका आणि निक दोन रिसेप्शन पार्टी देणार आहेतप्रियांका लवकरच कामावर परतणार आहे

सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ओमानमध्ये हनीमूनला गेले आहेत. हनीमूनवरुन परतल्यानंतर प्रियांका मुंबईत रिसेप्शन देणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते.  


रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक दोन रिसेप्शन पार्टी देणार आहेत. 19 डिसेंबरला तिच्या मित्र परिवारासाठी तर 20 डिसेंबरला बॉलिवूडसाठी. 19 नोव्हेंबरची पार्टी सांताक्रूझमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आली आहे. याआधी प्रियांकाने लग्नानंतर फॅमिलीसाठी दिल्लीत ग्रँड रिसेप्शन दिले होते. 


गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. यादरम्यान प्रियांकाला घ्यायला निक अगदी घोडीवरून वाजतगाजत आला.त्यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, हे सांगणे नकोच. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता. प्रियांका लवकरच कामावर परतणार आहे ती  'द स्काय इज पिंक’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते. 

Web Title: Priyanka Chopra-Nick Jonas this is the Mumbai's Reception Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.