Priyanka Chopra is the most expensive actress in the industry! | दीपिकाला मागे टाकत प्रियांका चोप्रा बनली इंडस्ट्रीतील सर्वाधिक ‘महाग’ अभिनेत्री!!

हॉलिवूडमध्ये बिझी असलेली प्रियांका चोप्रा लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटात प्रियांकाची वर्णी लागली आहे. आता या बातमीशी संबंधित आणखी काही ताजे अपडेट्स आहेत. होय, ताजी चर्चा मानाल तर प्रियांकाने सलमान स्टारर या चित्रपटासाठी आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त फी घेतली आहे आणि सोबत हाऐस्ट पेड अ‍ॅक्ट्रेसच्या यादीत दीपिका पादुकोण हिला मागे टाकले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ‘एकसमान वेतन’चा मुद्दा गरम आहे. दीपिका पादुकोण, कंगना राणौत, प्रियांका चोप्रा आदींनी या मुद्यावर आपला आवाज बुलंद केला आहे. नट्या नायकाइतकीच मेहनत घेत असतील तर त्यांना हिरोइतके मानधन का नाही? असा त्यांचा सवाल आहे. खरे तर त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. कारण केवळ अभिनेत्याच्या जोरावर चित्रपट हिट होण्याचे दिवस आता इतिहासजमा झालेत. प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचत आणण्याचा दम बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी अलीकडे दाखवला आहे. ‘पद्मावत’, ‘राजी’, ‘हिचकी’, ‘वीरे दी वेडिंग’ हे अगदी नुकतेच रिलीज झालेले चित्रपट बघितले तरी हे पटेल. त्यापूर्वी ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’, ‘मॉम’ हे चित्रपटही अभिनेत्रींचे पारडे जड करणारे आहेत.
सूत्रांचे मानाल तर ‘भारत’साठी प्रियांकाने 12 कोटी रूपये घेतले आहेत आणि याचसोबत ती इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. यापूर्वी हा किताब दीपिकाच्या नावे होता. दीपिका पादुकोणने ‘पद्मावत’साठी अन्य अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वाधिक 11 कोटी रूपये मानधन घेतले होते.

ALSO READ : ​फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!!

सलमान आणि प्रियांकाची जोडी 2004 मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. रसिकांना दोघांची केमिस्ट्री आवडली देखील होती. त्यामुळे सलमान आणि प्रियांकाचे फॅन्स या चित्रपटाची नक्कीच आतुरतेने वाट पाहत असतील.  टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 2019च्या ईदला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 
Web Title: Priyanka Chopra is the most expensive actress in the industry!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.