‘मिसेस जोनास’ बनून प्रथमच इंटरनॅशनल शोमध्ये हजेरी लावणार प्रियांका चोप्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 11:51 AM2019-01-18T11:51:06+5:302019-01-18T11:51:28+5:30

सन २०१६ मध्ये प्रियांका चोप्रा प्रथमच एका इंटरनॅशनल शोमध्ये दिसली होती. या शोचे नाव होते, ‘द एलन डीजेनेरस’. हा शो एक लोकप्रीय अमेरिकन टॉक शो आहे. आता सुमारे दोन वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एकदा या शोमध्ये हजेरी लावणार आहे.

Priyanka Chopra to make her first appearance as Mrs Nick Jonas on Hollywood's The Ellen Degeneres Show | ‘मिसेस जोनास’ बनून प्रथमच इंटरनॅशनल शोमध्ये हजेरी लावणार प्रियांका चोप्रा!

‘मिसेस जोनास’ बनून प्रथमच इंटरनॅशनल शोमध्ये हजेरी लावणार प्रियांका चोप्रा!

googlenewsNext

सन २०१६ मध्ये प्रियांका चोप्रा प्रथमच एका इंटरनॅशनल शोमध्ये दिसली होती. या शोचे नाव होते, ‘द एलन डीजेनेरस’. हा शो एक लोकप्रीय अमेरिकन टॉक शो आहे. आता सुमारे दोन वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एकदा या शोमध्ये हजेरी लावणार आहे. यादरम्यान ती आपल्या तिसºया हॉलिवूड सिनेमाचे प्रमोशन करताना दिसेल. येत्या ३० जानेवारीला प्रियांका या शोसाठी शूट करणार आहे. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका प्रथमच एका इंटरनॅशनल शोमध्ये गेस्ट बनून जाणार असल्याने, हा क्षण तिच्यासाठी खास असणार आहे.
प्रियांकाचा तिसरा हॉलिवूड सिनेमा ‘इज नॉट इट रोमॅन्टिक’ लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटात ती अभिनेता रेबल विल्सन, लियाम हेम्सवर्थ आणि एडम डेविनसोबत दिसेल. या रोमॅन्टिक कॉमेडी हॉलिवूडपटात प्रियांकाने योगा अ‍ॅम्बिसीडर इसाबेलाची भूमिका साकारली आहे. येत्या १४ फेबु्रवारीला हा चित्रपट रिलीज होतोय.

 (दोन वर्षांपूर्वी ‘द एलन डीजेनेरस’मध्ये प्रियांकाने हजेरी लावली होती.)

गतावर्षी आॅगस्टमध्ये निकयांकाचा ‘रोका’ झाला होता. यानंतर गत १ डिसेंबरला प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. २ डिसेंबरला तिने हिंदू पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.
लग्नानंतर प्रियांका  पुन्हा एकदा भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.

Web Title: Priyanka Chopra to make her first appearance as Mrs Nick Jonas on Hollywood's The Ellen Degeneres Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.