Priyanka Chopra gets 'Sexiest Asian Woman' Deepika Padukone | ​दीपिका पादुकोणला पछाडत प्रियांका चोप्रा पुन्हा बनली ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’!

‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’चा मान पुन्हा एकदा प्रियांका चोप्राला मिळाला आहे. होय, गतवर्षी प्रियांकाला पछाडत दीपिका पादुकोण हिने  ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत पहिले स्थान मिळवले होते. पण यंदा  दीपिकाला धक्का देत प्रियांकाने पुन्हा एकदा या स्थानावर कब्जा मिळवला आहे.   लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ५०‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली आहे. या यादीत  प्रियांकाने अग्रस्थान पटकावले आहे. तर दीपिकाचे नाव पहिल्या स्थानावरून चक्क तिसºया स्थानावर घसरले आहे.  गेल्या वर्षी तिसºया स्थानावर असणारी छोट्या पडद्यावरची बोल्ड अभिनेत्री निया शर्माने दीपिकाला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे.‘सेक्सिएस्ट एशियन वूमन२०१७’ च्या यादीत पहिल्या सहामध्ये अनुक्रमे प्रियांका चोप्रा, निया शर्मा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, माहिरा खान आणि द्र्रष्टी धामी यांनी स्थान मिळवले आहे.   ‘इस्टर्न आय’चे एडिटर आणि ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’चे संस्थापक असजाद नजीर यांनी प्रियांका चोप्राला सुंदर, प्रगल्भ, चाणाक्ष व सुंदर मनाची महिला म्हटले आहे. ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’ ठरलेल्या प्रियांकाने यानंतर सर्वांचे आभार मानले आहेत. ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’चा मान मिळाल्याचे श्रेय मी स्वत: घेऊ शकत नाही. सगळे क्रेडिट माझे जेनेटिक्स आणि तुमच्या आॅप्टिक्सला जाते. मी तुम्हा सर्वांची आभारी आहे, असे प्रियांकाने म्हटले आहे.

ALSO READ : प्रियांका चोप्राची ही ताजी पोस्ट नव्या प्रोजेक्टचे संकेत तर नाही?

प्रियांका आता केवळ बॉलिवूड वा हॉलिवूड अभिनेत्री राहिलेली नाही तर एक लोकप्रीय इंटरनॅशनल स्टार झाली आहे. देशातच नाही तर विदेशातही तिचे लाखो चाहते व फॉलोअर्स आहेत. प्रियांका सध्या ‘क्वांटिको3’ या अमेरिकन सीरिजमध्ये बिझी आहे. याशिवाय तिचे एकापाठोपाठ एक असे तीन हॉलिवूड सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
५० ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत आलिया भट्ट चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिलाही स्थान मिळाले आहे. कॅटरिना कैफ सातव्या आणि श्रद्धा कपूर आठव्या क्रमांकावर आहे.
Web Title: Priyanka Chopra gets 'Sexiest Asian Woman' Deepika Padukone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.