Priyanka Chopra is enjoying the countrywide vacation! | 'या' देशात व्हेकेशन एन्जॉय करतेय प्रियांका चोप्रा !

दीपिका पादुकोण, ऐश्वर्या रॉय बच्चनप्रमाणे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रियांका चोप्रानेदेखील आपला जलवा दाखवला. सध्या प्रियांका कॉलिफोर्नियामध्ये आपल्या फॅमिलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करते आहे. प्रियांकाने कॉलिफोर्नियामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

क्वांटिकोच्या सीझन 3 चे प्रमोशन संपल्यानंतर प्रियांका रिलअॅक्स मूडमध्ये दिसली. कॉलिफोर्नियाच्या बीचवरील लाल रंगाच्या बिकनीमधला फोटो प्रियांकाने शेअर केला आहे. यात ती स्टायलिश अंदाजात दिसते आहे. 

प्रियांकाच्या' क्वांटिको' हा अमेरिकन टीव्ही शो बंद होणार आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार एसीबी नेटवर्कने दिलेल्या वाईट टेलिव्हिजन रेटिंगमुळे प्रियांका चोप्राचा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा क्वांटिकोच्या याआधीच्या दोन सीझनची भाग होती.  तिसऱ्या सीजनमध्ये एफबीआय एजेंटच्या भूमिकेमध्ये दिसली होती.  गेल्या महिन्यापांसून क्वांटिकोचे टेलिकास्ट सुरु झाले होते. मात्र 13 एपिसोडमध्ये ते बंद करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत टेलिकास्ट सुरु राहणार आहे. 

ALSO READ :  MET GALA 2018 : प्रियांका चोप्रा पुन्हा तिच्या ड्रेसवरून झाली ट्रोल!

क्वांटिको शोच्या माध्यमातून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने दोन चित्रपटांमध्ये देखील काम केले. लवकरच देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये देखील कमबॅक करणार आहे.  सलमान खानच्या भारत चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. अली अब्बास जफर दिग्दर्शित‘भारत’मध्ये प्रियांकासोबत कॅटरिना कैफ असल्याचेही मानले जात आहे. सर्वातआधी २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान व प्रियांका एकत्र दिसले होते. यानंतर ‘सलाम ए इश्क’ आणि ‘गॉड तुस्सी गे्रट हो’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे.५२ वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये १८ वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. 
Web Title: Priyanka Chopra is enjoying the countrywide vacation!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.