Priyanka Chopra with boyfriend Nick Jonas in India! This is the plan for 'Desi Girl' trip! | ​ बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत प्रियांका चोप्रा भारतात! असा आहे ‘देसी गर्ल’चा या भेटीमागचा प्लान!!

प्रियांका चोप्रा तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनाससोबत भारतात येणार, ही बातमी काल अखेर खरी ठरली. प्रियांका व निक दोघेही काल रात्री उशीरा मुंबई एअरपोर्टवर उतरले. प्रियांका निकला आपल्या कुटुंबाशी विशेषत: आई मधू चोप्रा हिला भेटवू इच्छिते, असे मानले जात आहे. मुंबई एअरपोर्टवर उतरल्यावर मीडियाने निक व प्रियांका दोघांनाही कॅमे-यात कैद करण्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. पण दोघेही त्या मूडमध्ये नव्हते़ दोघेही उतरले आणि मीडियाला चकवा देत, आपल्या गाडीतून बाहेर पडलेत. लॉन्स एंजिल्समध्ये अगदी हातात हात घालून फिरणा-या निक व प्रियांका या दोघांनीही भारतात पाय ठेवताच इतकी गुप्तता का पाळली, हे मात्र कळायला मार्ग नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाने मुंबईत समुद्र किनारी एक अलिशान बंगला खरेदी केला आहे. हा सुमारे १०० कोटींचा बंगला प्रियांकाचे स्वप्न असल्याचे कळते. यानिमित्त ती एक ग्रॅण्ड पार्टी देऊ इच्छिते. याच पार्टीत निकला आपल्या काही जवळच्या मित्रांना भेटवण्याचाही प्रियांकाचा इरादा असल्याचे कळते. हे खरे असेल तर प्रियांका अगदी नियोजित पद्धतीने आपले रिलेशन पुढे नेत असल्याचे दिसते.
मध्यंतरी प्रियांका व निक दोघेही लिव्ह इनमध्ये राहणार, अशी बातमी होती. प्रियांका निकपेक्षा बरीच मोठी आहे. त्याअर्थाने ती आपल्यापेक्षा अधिक प्रगल्भ आहे, असे निकचे मानणे आहे.एकंदर काय तर प्रियांका व निकच्या रिलेशनशिपच्या बातम्या आता बºयाच अंशी ख-या वाटू लागल्या आहेत. येत्या काळात या नात्याचे बंध किती दृढ होतात, ते आपण बघूच.
 
ALSO READ : ​फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!! 

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निक जोनस याच्याशी तिचे नाव जोडले जात आहे, तर प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. गेल्या आठवड्यात प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली. गदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नाही. 
२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती.  
Web Title: Priyanka Chopra with boyfriend Nick Jonas in India! This is the plan for 'Desi Girl' trip!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.