.... आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी केला साखरपुडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:44 AM2018-07-27T11:44:21+5:302018-07-27T11:45:36+5:30

प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती.

priyanka chopra and nick jonas got engaged? | .... आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी केला साखरपुडा?

.... आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी केला साखरपुडा?

googlenewsNext

प्रियांका चोप्रा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असल्याची आपल्याला दिसून येत आहे. प्रियांका चोप्रा आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनास हे दोघेही नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी येथे आल्यानंतर त्यांच्या प्रेमाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली असे म्हटल्यास काहीही चुकीचे ठरणार नाही आणि आता तर प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दोघांनी साखरपुडा केला असल्याच्या बातम्या येत आहेत. प्रियांकाचा वाढदिवस १८ जुलैला होता. तिच्या वाढदिवसालाच तिला खास भेट मिळाली असल्याची चर्चा आहे.
प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. निकने ही अंगठी तिला साखरपुड्यात घातली असून ते दोघे साखरपुड्यांनंतर खूपच खूश आहेत. निकच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला कधीच इतके खूश पाहिले नव्हते असे देखील त्यांचे म्हणणे आहे. निक त्याच्या आणि प्रियांकाच्या नात्याबद्दल खूपच गंभीर आहे. 
प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच सध्या हॉलिवूडमध्ये देखील तिने तिच्या अभिनयाने एक जागा निर्माण केली आहे. ती बॉलिवूडप्रमाणेहॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहे तर निक जोनास हा एक प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची ख्याती असून त्याचे आजवरचे अनेक अल्बम फेमस झालेले आहेत.
प्रियांका आणि निक दोघे गेल्या महिन्यात सुमारे आठवडाभर भारतात होते. खास प्रियांकाच्या आईला, कुटुंबाला भेटायला निक भारतात आला होता. भारतात निक, प्रियांका अगदी बिनधास्त एकत्र फिरले, हातात हात घालून पार्ट्यांना पोहोचले. तसेच ते दोघे गोव्याला देखील प्रियांकाच्या कुटुंबियांसोबत गेले होते. काही दिवस भारतात राहिल्यानंतर प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना झाली आणि या कथित जोडप्याचा भारत दौरा संपला. पण भारतातून गेल्यानंतर त्या दोघांनी साखरपुडा केला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.   

Web Title: priyanka chopra and nick jonas got engaged?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.