ठळक मुद्देकाही तासांपूर्वी या कपलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी व काही फोटो शेअर केलेत. या व्हिडिओ आणि फोटोत निकयांका एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि मौज मज्जा करताना दिसत आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवन येथे लग्नगाठ बांधली. तेव्हापासून हे कपल कायम चर्चेत आहे. लग्न आणि रिसेप्शननंतर हे कपल ओमानमध्ये हनीमूनसाठी गेले. यानंतर प्रियांका व निकने फॅमिलीसोबत काही वेळ घालवला. तूर्तास हे कपल कॅरेबियन आयलँडमध्ये आहे. काही तासांपूर्वी या कपलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी व काही फोटो शेअर केलेत. या व्हिडिओ आणि फोटोत निकयांका एकमेकांसोबत वेळ घालवताना आणि मौज मज्जा करताना दिसत आहेत.


एका व्हिडिओत प्रियांका समुद्राच्या काठावर झोपाळ्यावर उंच झोके घेताना दिसतेय. तर तिचा पती निक याचे शूटींग करतोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान हिट झालाय आणि वेगाने व्हायरल होतोय. केवळ पाच तासांत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि कसा वाटला ते जरूर कळवा.


गतवर्षी आॅगस्टमध्ये निकयांकाचा ‘रोका’ झाला होता. यानंतर गत १ डिसेंबरला प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. २ डिसेंबरला तिने हिंदू पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.

लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.

English summary :
Priyanka Chopra and Nick Jonas went for a honeymoon in Oman. After that, spend some time with family. Now they are in the Caribbean Islands. A couple of hours ago, the couple shared a story and some photos on Instagram.


Web Title: priyanka chopra and nick jonas chill in the romantic vacation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.