priyanka chopra and janhvi kapoor out from karan johars dostana 2 deepika padukone will play the lead in the film | प्रियांका,जान्हवी नाही तर दीपिका पादुकोण साकारणार ‘दोस्ताना 2’!!
प्रियांका,जान्हवी नाही तर दीपिका पादुकोण साकारणार ‘दोस्ताना 2’!!

ठळक मुद्देदीपिकाने अलीकडे अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले. लग्नानंतर दीपिका मेघना गुलजारच्या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांवर बेतलेल्या चित्रपटात दिसणार आहे. मेघनाचा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर कदाचित ती ‘दोस्ताना 2’बद्दल घोषणा करू शकते.

सन २००८ मध्ये आलेल्या प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन स्टारर ‘दोस्ताना’ या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा ब-याच दिवसांपासून रंगतेय. ‘दोस्ताना’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. अगदी तेव्हापासून या चित्रपटाचा सीक्वल येणार, असे मानले जात होते. अर्थात जोपर्यंत एक दमदार स्क्रिप्ट मिळत नाही, तोपर्यंत ‘दोस्ताना 2’ बनणार नाही, असे करण जोहरने स्पष्ट केले होते. पण ताजी खबर खरी मानाल तर करण जोहरला ‘दोस्ताना 2’साठी एक दमदार स्क्रिप्ट मिळाली आहे आणि त्याने या सीक्वलवर काम सुरू केले आहे.


‘दोस्ताना’मध्ये प्रियांका लीड रोलमध्ये होती. ‘दोस्ताना 2’मध्ये जान्हवी कपूर दिसणार, अशी खबर मध्यंतरी आली होती. पण आता एक वेगळीच बातमी कानावर येतेय. होय, चर्चा खरी मानाल तर करण जोहर निर्मित या सीक्वलमध्ये जान्हवी नाही तर दीपिका पादुकोण झळकणार आहे. दीपिकाने अलीकडे अभिनेता रणवीर सिंगसोबत लग्न केले. लग्नानंतर दीपिका मेघना गुलजारच्या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांवर बेतलेल्या चित्रपटात दिसणार आहे. मेघनाचा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर कदाचित ती ‘दोस्ताना 2’बद्दल घोषणा करू शकते.


‘दोस्ताना 2’ मधील मेल अ‍ॅक्टरचे म्हणाल तर त्यांचाही शोध सुरु आहे. तूर्तास सिद्धार्थ मल्होत्रा व राजकुमार राव हे दोघे यासाठी दावेदार मानले जात आहेत. पण धर्मा प्रॉडक्शनने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. अर्थात येत्या काही दिवसांत सगळे काही स्पष्ट होईलच.
‘दोस्ताना ’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर खूपच गाजला होता. जॉन अब्राहमच्या या चित्रपटातील एका सीनची तर प्रचंड चर्चा झाली होती. बिचवर चित्रित करण्यात आलेल्या जॉनचा हा सीन चित्रपटाइतकाच गाजला होता.


Web Title: priyanka chopra and janhvi kapoor out from karan johars dostana 2 deepika padukone will play the lead in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.