Priya Prakash Warrior's song promises! Complaint filed with police | ​प्रिया प्रकाश वारियरचे गाणे वादात! पोलिसांत तक्रार दाखल!!

मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर एका गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झाली. पण प्रिया प्रकाशचे हे गाणेच वादात सापडले आहे. या गाण्यातील काही शब्दांवर आक्षेप नोंदवत, आंध्रप्रदेशच्या हैदराबादेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अर्थात ही तक्रार प्रिया प्रकाशविरोधात नाही तर तिच्या गाण्याविरोधात आहे.
  ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याचे शब्द मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचे संबंधित तक्रारीत म्हटले आहे. हैदराबादच्या फारूखनगर भागात राहणा-या एका युवकाने ही तक्रार दाखल केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासानंतर ही तक्रार सायबर क्राईम विभागाकडे सोपवले जाऊ शकते.ALSO READ : ​‘व्हायरल गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक ‘खल्लास’ व्हिडिओ !पाहा, ‘ओरू अडार लव’चा valentines day special teaser!!

  ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्यात शाळेच्या दिवसांतले प्रेम दाखवले आहे. या गाण्यातील प्रिया प्रकाशची व्हिडिओ क्लिप वाºयाच्या वेगाने व्हायरल झाली होती. या व्हिडिओने प्रिया प्रकाशला तुफान लोकप्रीयता मिळवून दिली.  प्रियाच प्रिया प्रकाश वारियर त्रिशूरची राहणारी आहे. १८ वर्षांची प्रिया बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी आहे.   ‘ओरू अडार लव’ या चित्रपटाद्वारे ती अ‍ॅक्टिंग डेब्यू करतेय. येत्या ३ मार्चला हा चित्रपट रिलीज होतो आहे.
अलीकडे एका मुलाखतीत प्रियाने इंटरनेटवर लोकप्रीय झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला. असे काही झालेय, यावर माझा विश्वास बसत नाहीयं. माझ्या डेब्यू सिनेमाच्या गाण्याचा एक व्हिडिओ माझे आयुष्य बदलवणारा ठरेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती. मी या गाण्यात माझ्या आयब्रोद्वारे एक्सप्रेशन देत प्रेम व्यक्त करावेत, असे दिग्दर्शकाने मला सांगितले. दिग्दर्शकाने जे सांगितले तेच मी केले, असे ती म्हणाली.
Web Title: Priya Prakash Warrior's song promises! Complaint filed with police
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.