Prasanna went to Bharvasta to get expensive, get legal notice | भररस्त्यावर झापणे अनुष्काला पडले महाग, मिळाले कायदेशीर नोटीस
भररस्त्यावर झापणे अनुष्काला पडले महाग, मिळाले कायदेशीर नोटीस
रस्त्यावर प्लास्टिकची बाटली फेकणा-या एक युवकाला भररस्त्यात झापणे, अभिनेत्री अनुष्का शर्माला चांगलेच महागात पडले आहे. होय, कचरा फेकणा-या या अरहान सिंग नामक युवकाने अनुष्का व तिचा पती विराट कोहली दोघांनाही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अनुष्का व विराट यांनी भररस्त्यात ज्या पद्धतीने मला अपमानास्पद वागणूक दिली, त्याबद्दल त्यांनी माझी माफी मागावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
 खुद्द अरहान याने याबद्दल मीडियासमोर माहिती दिली. ‘ माझ्या कायदेविषयक सल्लागाराने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कोहली या दोघांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी माझी माफी मागावी, असे त्या नोटिसमध्ये नमूद केले आहे. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. माझ्या नोटीसला ते  उत्तर देत नाहीत, तोपर्यंत मी त्याच्या प्रतिसादाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या पेक्षा जास्त मी काही बोलू इच्छित नाही,’ असे अरहानने सांगितले.

ALSO READ : अनुष्का शर्माने ज्याला भररस्त्यात झापले त्या तरूणाचे आहे बॉलिवूडशी खास नाते! शाहरूखसोबत केलेयं काम!! 

 अनुष्का पती विराट कोहलीसह आपल्या कारने दिल्लीत प्रवास करत  असताना समोरच्या गाडीतील एका व्यक्तीने रिकामी पाण्याची बाटली बाहेर फेकली होती. हे पाहून चिडलेल्या अनुष्काने त्या गाडीतील युवकाला भररस्त्यात सुनावले होते. याचा व्हिडिओ विराटने  सोशल मीडियावर शेअर केला होता. पण यानंतर काही तासांत या प्रकरणात एक  ट्विस्ट आला होता. होय, ज्या व्यक्तिला अनुष्काने सुनावले होते, त्या व्हिडिओतील व्यक्तिनेही अनुष्काला तितकेच खरमरीत उत्तर दिले होते. अरहान सिंग नामक या व्यक्तिने अनुष्काच्या व्हिडिओचा स्क्रिनशॉट शेअर आपली भूमिका मांडली होती. ‘या पोस्टद्वारे मी कुठलाही फायदा उचलू इच्छित नाही. माझ्या बेजबाबदारपणामुळे जे झाले ते चुकीचेच आहे. मी निष्काळजीपणे प्लास्टिकचा एक तुकडा कारबाहेर फेकला होता. पण अनुष्काने आपल्या कारच्या खिडकीची काच खाली करून माझ्यावर एखाद्या वेड्यागत ओरडणे सुरू केले. मी माझ्या चुकीसाठी माफी मागितली. अनुष्का शर्मा कोहली, तुझी भाषा थोडी सभ्य असतील तर तुझी स्टार म्हणून असलेली उंची कमी झाली नसती. माणसात स्वच्छतेच्या जाणीवेसोबतचं थोडी सभ्यताही असायला हवी. माझ्या कारमधून मी फेकलेला प्लास्टिकचा तुकडा तुझ्या तोंडून निघालेल्या कच-यापेक्षा कमीचं होता, असे या व्यक्तिने अनुष्काला उद्देशून लिहिले होते. 
Web Title: Prasanna went to Bharvasta to get expensive, get legal notice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.