Prakash Raj said, 'I am not anti-Hindu, but Modi is anti-Shah' !! | प्रकाश राजने म्हटले, ‘मी हिंदूविरोधी नव्हे, तर मोदी अन् शाहविरोधी आहे’!!

साउथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते प्रकाश राज सध्या त्यांच्या अभिनयापेक्षा राजकीय वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहेत. नुकतेच ते एका टीव्ही चॅनेलच्या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारविषयी आपली भूमिका माडली. प्रकाश राज यांनी म्हटले की, ‘मी हिंदूविरोधी नाही. मी केवळ मोदींचा विरोध करतो. टीकाकारांनी माझ्यावर चुकीच्या पद्धतीचे आरोप लावले आहेत.’ एका टीव्ही चॅनेलने आयोजित केलेल्या चर्चेत त्यांनी अतिशय निर्भिडपणे हे वक्तव्य केले. यावेळी त्यांना स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवणे अवघड झाले होते. कारण ते खूपच ओरडून आपले मत मांडत होते. 

त्यांनी म्हटले की, टीकाकार म्हणतात मी हिंदूविरोधी आहे. मात्र मी हिंदूविरोधी नसून मोदी, शाह आणि हेगडेविरोधी आहे. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि भाजपा नेते तथा केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्याकडे इशारा करीत होते. त्यांनी म्हटले की, ‘हत्या करणाºयांचे समर्थन करणाºयांनी स्वत:ला हिंदू म्हणू नये. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आनंद साजरा करणाºया मोदी समर्थकांविषयी जेव्हा मी पंतप्रधानांना प्रतिक्रिया मागितली होती तेव्हा ते शांत होते.’

पुढे बोलताना प्रकाश राज यांनी म्हटले की, ‘एक खरा हिंदू अशाप्रकारचे कृत्य करणाºयांचे कधीच समर्थन करू शकत नाही.’ यावेळी तेलंगणाचे भाजपा प्रवक्ता कृष्णा सागर राव यांनी प्रकाश राज यांचा कडाडून विरोध केला. यावेळी प्रकाश राजने म्हटले की, ‘जर तुम्ही हिंदूविरोधी बोलू शकता, तर मग मी हिंदूविरोधी नाही असे का सांगू नये?’ दरम्यान, गेल्या काहीकाळापासून प्रकाश राज विरुद्ध भाजपा असा सामना बघावयास मिळत आहे. 

Web Title: Prakash Raj said, 'I am not anti-Hindu, but Modi is anti-Shah' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.