Prabhudeva changed so much to dance? If you can not believe it, see 'Mercery teaser'! | ​डान्स करता करता इतका कसा बदलला प्रभुदेवा? विश्वास बसत नसेल तर पाहा, ‘मरकरी’चा टीजर!

अभिनेता, कोरिओग्राफर, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकेत वावरणारा प्रभूदेवा आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. होय, आत्तापर्यंत स्वत: नाचणारा आणि बड्या बड्यांना नाचवणारा प्रभुदेवा आता प्रेक्षकांना घाबरवणार आहे. प्रभुदेवाच्या ‘मरकरी’ या चित्रपटाचा टीजर पाहिल्यानंतर आम्ही काय म्हणतोय, ते तुमच्या लक्षात येईल.  या टिजरमध्ये प्रभुदेवाचे एक भयावह रूप पाहायला मिळत आहे.  आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर त्याने या चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे. यात प्रभुदेवा कधी नव्हे अशा रूपात दिसतो आहे. टीजर एकदम शानदार आहे. कार्तिक सब्बाराज याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
प्रभुदेवाचा हा आगामी चित्रपट एक सायलेन्ट थ्रीलर असल्याचे सांगितले जात आहे. यात प्रभुदेवाशिवाय सनत, दीपक आणि रेम्या नम्बिसन असे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. यापूर्वी प्रभुदेवा ‘तूतक तूतक तूतिया’ या हॉरर कॉमेडीत दिसला आहे. अर्थात बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नव्हता. ‘भारताचा मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखल्या जाणा-या प्रभुदेवाने अभिनेता म्हणून तो ओळख निर्माण करू शकला नाही. पण आपल्या नृत्याने त्याने भारतातील कोट्यवधी नृत्यवेड्यांना जणू वेड लावले. प्रभुदेवाचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेन्द्र प्रसाद दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. खरे तर प्रभुदेवाला अ‍ॅक्टर व्हायचे होते. प्रभुदेवाने आपले करिअर एक डान्सर आणि अभिनेता म्हणून सुरू केले. मात्र अभिनयात त्याला फार यश गाठता आले नाही. प्रभुदेवाने आपल्या करिअरची सुरुवात डान्स कोरिओग्राफर म्हणून केली होती. मात्र नंतर त्याला अभिनय खुणावू लागला. यानंतर १९९४ मध्ये ्रप्रभुदेवाने ‘इंदू’ नामक सिनेमा केला. या चित्रपटात त्याच्या अपोझिट दिसली होती ती अभिनेत्री रोजा. प्रभुदेवाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी अशा अनेक चित्रपटांत काम केले. शिवाय १०० पेक्षा अधिक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. नृत्यदिग्दर्शनासाठी प्रभुदेवाला दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 

ALSO READ : नयनतारा नावाच्या वादळाने ‘उद्धवस्त’ केले प्रभुदेवाचे आयुष्य!!
Web Title: Prabhudeva changed so much to dance? If you can not believe it, see 'Mercery teaser'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.