Prabhu Deva and Arbaaz Khan were seen outside Salman Khan's office | सलमान खानच्या ऑफिस बाहेर दिसले प्रभूदेवा आणि अरबाज खान

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट दबंग 3 ची चर्चा आहे. सलमान खान आणि त्याच्या टीमने यावर काम सुद्धा सुरु केले आहे. याबाबतचे पुरावे देखील आता मिळाले आहेत. सोमवारी रात्री सलमान खान, अरबाज खान आणि प्रभुदेवा सलमानच्या ऑफिसच्या बाहेर दिसले. या तिघांना एकत्र बघून हा अंदाज लावण्यात येतो आहे की, हे तिघे दबंग 3 चित्रपटाच्या चर्चेसाठी एकत्र भेटले असतील. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन अरबाज खान नाही तर प्रभुदेवा करणार आहे. हा निर्णय स्वत: अरबाज खाननेच घेतला आहे. दबंग 3 मध्ये सुद्धा सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा दिसण्याची चिन्ह आहेत. या चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. 

दबंग सीरिजचे आधीचे दोन्ही चित्रपट सुपरहिट गेले होते. यात सलमान खानेन साकारलेले चुलबुल पांडेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. अरबाज खानने ‘दबंग3’च्या स्क्रिप्टवर काम सुरु केले आहे. ‘मुन्नी बदनाम’ सारखे एक धम्माल आयटम साँग असणार आहे. पण या आयटम साँगमध्ये ‘मुन्नी’ नाही तर ‘सन्नी’ असणार आहे. होय, म्हणजेच मलायका अरोरा नाही तर सनी लिओनी दिसणार असल्याची चर्चा होती. हा चित्रपट एमी जॅक्सनला आॅफर झाल्याची बातमी मध्यंतरी आली होती. अर्थात एमीने अद्याप काहीही कन्फर्म केलेले नाही. 

ALSO RAED : जबरदस्त अ‍ॅक्शन; दमदार डायलॉग ! ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला!!

नुकतेच सलमानेन टायगर जिंदा है चे शूटिंग पूर्ण केले आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या जोडीचा हा चित्रपट ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट एक था टायगर है चा सीक्वल आहे.यानंतर तो रोमो डिसुझाच्या रेस 3 चित्रपटाच्या कामाला लागणार आहे. यात चित्रपटात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस,  डेजी शाह आणि बॉबी देओल सुद्धा असणार आहे. याचित्रपटाची शूटिंग मुंबईत होणार आहे.आधी या चित्रपटाच्या शूटिंगला आबुधाबीमधून सुरुवात होणार होती. मात्र बिग बॉसच्या शूटिंग मुंबईत सुरु असल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगला देखील मुंबईत सुरुवात होणार आहे.
Web Title: Prabhu Deva and Arbaaz Khan were seen outside Salman Khan's office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.