Prabhas will become 'Prabhu Ram'? | ​प्रभास बनणार ‘प्रभू राम’?

‘बाहुबली’ प्रभास हा येत्या काळात आणखी एका वेगळ्या भूमिकेत दिसू शकतो. होय, प्रभासने प्रभू रामचंद्राची भूमिका साकारावी, असे अनेक प्रस्ताव प्रभासकडे येत आहेत. एका वृत्तानुसार, अनेक इव्हेंट आॅर्गनायझर्स आणि कंपन्यांनी यासाठी प्रभासला गळ घातली आहे. या दसºयाला प्रभासने प्रभू रामचंद्र बनून रावणाच्या पुतळ्याचे दहन करावे, असे प्रस्ताव प्रभासला मिळत आहेत. भारतात दसºयाच्या दिवशी रावण दहनाची प्रथा आहे. ‘बाहुबली’तील प्रभासचे अ‍ॅक्शन सीन पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यात ‘प्रभू रामचंद्र’ दिसू लागला आहे. याचमुळे प्रभासला अशा अनेक आॅफर्स मिळताहेत. आता प्रभास ही आॅफर्स स्वीकारतो वा नाही, ठाऊक नाही. पण तूर्तास तरी तशी शक्यता कमी दिसतेय. सध्या प्रभास  ‘बाहुबली2’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. दिवसातले १६-१६ तास शूटींग सुरु आहे. या अतिव्यस्त वेळापत्रकातून प्रभास कसा वेळ काढतो, ते बघूच!!
Web Title: Prabhas will become 'Prabhu Ram'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.