Prabhas Ki 'Hirani' married in America, discusses news about persecution during shooting | प्रभासची ‘ती’ हिरोईन अमेरिकेत झाली विवाहबद्ध, शूटिंगवेळी छळ झाल्याच्या बातम्यांमुळे आलेली चर्चेत

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कन्कल्युजन या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. तो जे काही करतो त्याची चर्चा होते. मग ते अनुष्का शेट्टीसह अफेअर किंवा लग्नाच्या गोष्टी असो किंवा कोस्टारसह त्याचे अफेअर किंवा मग आणखी काही गोष्ट. प्रत्येक गोष्टीमुळे प्रभासची चर्चाच होतेच. शिवाय यामुळे प्रभाससह काम केलेल्या या अभिनेत्रीसुद्धा चर्चेत येतात. सध्या प्रभास आणि त्याची हिरोईन लाइमलाइटमध्ये आले आहेत. प्रभासची ही हिरोईन म्हणजे अभिनेत्री रिचा गंगोपाध्याय. 2013मध्ये मिर्ची या तेलुगू सिनेमात ती प्रभाससह झळकली होती. रिचानं तिच्या बालपणीच्या मित्रासह अमेरिकेत गुपचूप लग्न केल्याचं बोललं जात आहे. एका खासगी सोहळ्यात हे शुभमंगल पार पडलं. यासाठी रिचाने तिच्या निवडक मित्र-मैत्रिणींना बोलावलं होतं. मात्र रिचाकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. रिचा अपघातानंच अभिनयाच्या क्षेत्रात आली होती. तिने 2013 साली सिनेमा आणि अभिनयाच्या क्षेत्रातून एक्झिट घेतली होती. 2012 साली रिचा वादाच्या भोव-यात सापडली होती. त्यावेळी ती तमिळ अभिनेता सुंदर रामूचा सिनेमा मयक्कम एनाची शुटिंग करत होती. त्यावेळी सेटवर रिचाचा छळ होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सुंदर रामू आणि रिचा लिव इनमध्ये राहत असल्याच्याही त्यावेळी चर्चा रंगल्या होत्या. मात्र रिचानं या सगळ्या बातम्या आणि चर्चा खोट्या असल्याचा दावा केला होता. आता लग्नाच्या बातमीमुळे रिचा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.  

‘बाहुबली2’नंतर अनुष्का व प्रभासचे नाव जोडले जात आहे. अनुष्का शेट्टी दोन वर्षांपूर्वी लग्न करणार होती. पण प्रभासने तिला लग्न करण्यापासून रोखले, अशीही बातमी होती. अनुष्काने लग्नापेक्षा आपले सगळे लक्ष ‘बाहुबली2’वर केंद्रीत करावे, असे प्रभासचे मत होते. ‘बाहुबली’साठी प्रभासने स्वत:चे लग्नही पाच वर्षे लांबणीवर टाकले होते. कारण त्याला केवळ आणि केवळ ‘बाहुबली’वर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रभास ‘बाहुबली2’चे शूटींग करत असताना त्याला ६ हजार मुलींनी लग्नाची मागणी घातली होती.अभिनेत्री अनुष्का शेट्टीचे नाव प्रभाससोबत जोडले जात आहे. मात्र प्रभासने यावर त्याची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आता त्याचा संयम सुटला असून, नुकतेच त्याने याविषयी अतिशय बिनधास्तपणे प्रतिक्रिया दिली होती.प्रभासने  दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘लगेचच माझ्या फॅन्सला (फिमेल) काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण मी आताच लग्न करणार नाही. कारण सध्या मी याविषयी विचारदेखील करीत नाही.’
Web Title: Prabhas Ki 'Hirani' married in America, discusses news about persecution during shooting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.