Poonam Pandey changed her app for the convenience of fans! | चाहत्यांच्या सोयीसाठी पूनम पांडेनी तिच्या अ‍ॅपची बदलली भाषा !

सेक्सी अंदाजामुळे नेहमीच चर्चेत राहणारी पूनम पांडे सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. होय, पूनम पांडे हिने तिच्या प्रसिद्ध अ‍ॅपची भाषा हिंदीमध्ये केली आहे. सुरुवातीला हा अ‍ॅप इंग्लिशमध्ये होता, परंतु हिंदी भाषेला प्रमोट करण्यासाठी पूनमने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. खरं तर अ‍ॅप लॉन्च करण्याचा सेलिब्रिटींमध्ये ट्रेण्ड आहे. त्याचबरोबर बहुतेक सेलिब्रिटी त्यांच्या अ‍ॅपची भाषा इंग्रजी ठेवतात, परंतु पूनम पांडेने तिच्या अ‍ॅपची भाषा बदलून हिंदी केली आहे. 

वास्तविक, पूनमने हा निर्णय याकरिता घेतला की, तिचे अधिकाधिक चाहते हिंदी भाषिक आहेत. त्याचबरोबर हिंदीमध्ये अ‍ॅपचे लॉन्च करणारी पूनम पहिली अभिनेत्री ठरली आहे. ‘पूनम पांडे अ‍ॅप’मध्ये तिची लाइफ, फोटोज, व्हिडीओ आणि बायोग्राफी आदी माहितींचा समावेश आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पूनमच्या चाहत्यांना तिच्याविषयी जाणून घेता येणार आहे. त्याचबरोबर पूनमच्या हॉट अदाही या अ‍ॅपच्या माध्यमातून बघावयास मिळणार आहेत. 

ALSO READ : ‘पेज टू पेज’ व्हिडीओमध्ये पूनम पांडे ओलांडणार बोल्डनेसच्या परिसीमा!!

पूनम तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. हॉट व्हिडीओ आणि फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून ती खळबळ उडवून देत असते. आता ती या अ‍ॅपमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पूनमने तिचा एक बोल्ड फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘तुम्ही मला डान्स करताना बघू इच्छिता काय? तर मग माझ्या संपर्कात राहा...’ त्याचबरोबर पूनमने हेदेखील सांगितले होते की, तिचा लवकरच एक नवा म्युझिक व्हिडीओ येणार असून, त्याचे टायटल ‘पेज टू पेज’ असे असणार आहे. 

या अगोदरही तिने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती इंडोनेशियन मॉडेल्सबरोबर बघावयास मिळत होती. मॉडेलबरोबर पूनमचा अंदाज खूपच बोल्ड होता. दरम्यान, पूनम पहिल्यांदा तिच्या बोल्ड अंदाजाव्यतिरिक्त अ‍ॅप आणि त्यातही हिंदी भाषेमुळे चर्चेत आली आहे. 
Web Title: Poonam Pandey changed her app for the convenience of fans!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.